लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे यावर्षी शहरातील सर्व तलावात मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात टीनाचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
फुटाळा तलावाच्या परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आले आहे. भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे १० मध्यम विसर्जन कुंड तसेच ४ मोठे कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका परिणिता फुके, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे आदींनी पाहणी केली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी व सुरभी जायस्वाल आणि त्यांचे सहकारी पर्यावरण पूरक विसर्जनासाठी सहकार्य करीत आहे.