शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:54 AM

सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देजीएसआयचे महासंचालक मेश्राम भूजल स्रोत व पाणीसंकटावर राष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारत सरकार १०० स्मार्ट शहर निर्मितीचा प्रकल्प राबवित आहे, मात्र प्रत्येक नागरिकासाठी दररोज लागणारे १५० लिटर पाणी उपलब्ध आहे का, हा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगभरातील सरकारांनी पाण्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात होणारे युद्ध हे पाण्यासाठी असेल, अशी चिंता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक एस. एन. मेश्राम यांनी व्यक्त केली.गोंडवाना जिओलॉजिकल सोसायटी (जीएसआय) तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीजी जिओलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात भूजल आणि जमिनीवरील पाण्याच्या स्रोतांसमोरील आव्हाने’ या विषयावर धरमपेठ येथील वनामती येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. याच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे विभागीय संचालक डॉ. पी.के. जैन, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजोय रॉय, जीजीएसचे अध्यक्ष व परिषदेचे संयोजक डॉ. अंजन चटर्जी, विद्यापीठाच्या जिओलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. ए.एम. पोफरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डीजी एस.एन. मेश्राम पुढे म्हणाले, पाण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला, हे इतिहासात सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. वर्तमान काळात आपल्या जवळच महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक व तामिळनाडू तसेच भारत व चीन यांच्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सर्वांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाणी हा सुद्धा शाश्वत विकासाचा भाग आहे. पाणी संकट हे अंदाजाने नाही तर सर्वेक्षणाने मांडण्यात येत आहे. २०५० पर्यंत हे संकट अत्याधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे जलसंवर्धनाचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने आताच या दिशेने पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. भूजल पातळी खाली घसरत आहे, कावेरी व गोदावरी आदी नद्यांचे पात्र घटत चालले आहे. आपल्यासमोर केवळ पाणीटंचाईचे संकट उभे आहे, असे नाही तर पाण्याच्या प्रदूषणाचेही मोठे संकट उभे ठाकले आहे. जीएसआय सातत्याने यावर सर्वेक्षण करीत असते व यामध्ये प्रदूषणाच्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आपण स्वच्छ ऊर्जा व शाश्वत विकासाच्या गोष्टी करतो, मात्र सर्वांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी मिळावे, हा सुद्धा या संकल्पनेचा भाग ठरावा, अशी भावना मेश्राम यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे म्हणाले, हवा, पाणी व नैसर्गिक संपदेमध्ये वाढलेला मानवी हस्तक्षेप हे संकटाचे कारण आहे. हे आव्हान थोपविण्यासाठी आर्थिक धोरण राबविण्याची गरज डॉ. काणे यांनी व्यक्त केली. आयोजन सचिव ए.एम. वराडे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे भूषण लामसोंगे यांनी आभार मानले. दोन दिवसीय परिषदेमध्ये पाणी संवर्धनाशी संबंधित विविध विषयावर तज्ज्ञांद्वारे विचार मांडण्यात येणार आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपात