नागपूर : विभागात गेल्या चोवीस तासांत सरासरी ६२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात २१ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच पुढील पाच दिवस विभागात मुसळधार पाऊस होणार असून, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदियाला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हानिहाय अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात १५७, एटापल्ली १११, गडचिरोली ९७.१ मिमी, नागपूर ११८.२, काटोल तालुक्यात ११४.७, कुही ११०, मौदा १०७.९, नरखेड ९२.२, कामठी ९०.५, नागपूर ग्रामीण ८३.९, हिंगणा ८२.९ पारशिवनी ७७.९, कळमेश्वर ७०.३, उमरेड ६६ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ९१.५, पोंभुर्णा ७०.८ मिमी, वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यात ९६.९, वर्धा ८६.१, हिंगणघाट ७९.४, देवळी ७०.५, तर भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात ८७.६ मिमी पावसाची नोंद झाली.