आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या निकालात गेल्यावर्षीपेक्षा प्रगती करून ८५.५७ टक्के निकाल दिला आहे. गेल्यावर्षी हा निकाल ८२.७१ टक्के होता. यावर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलचा विद्यार्थी कार्तिकेय कोरंटलावार याने ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्ह्यातील ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जिल्ह्यात अत्यल्प आहे. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून एकूण ११ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.