शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नागपूर मेट्रो स्टेशन्सवर उमटली गडचिरोलीच्या रानावनातली पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 2:32 PM

भामरागड तालुक्यातल्या कोडपे व तिरकामेटा या दोन अति दुर्गम गावातील हे ३५ आदिवासी स्त्री पुरुष प्रथमच बाहेरचे जग अनुभवायला निघाले होते.

ठळक मुद्देकाय पाहू आणि काय नको असे झालेकाहींनी प्रथमच रेल्वे पाहिली

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सकाळी साडेदहा-अकराची वेळ. वर्धा रोडवरच्या साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच्या निशब्द वातावरणात माडिया भाषेत गडबड सुरू झाली. पण गटप्रमुखाने दिलेल्या आदेशाचे पालन करत शिस्तीत सगळेजण चालू लागले. एरव्ही शहरात मॉल वा सिनेमा हॉलमध्ये कुणी प्रथमच एस्कलेटरवर पाय ठेवणारं असेल तर त्यांची घाबरगुंडी व गोंधळ ठरलेलाच. पण वाघा-अस्वलाशी टक्कर घेणारा हा माडिया आदिवासी मुळीच गडबडला नाही. त्या सरकत्या जिन्यावर उभं राहण्याचं टेक्निक काही क्षणातच शिकून त्यावर चढता झाला. पुढ्यात आलेल्या मेट्रोच्या वातानुकूलित डब्यात शिरून स्थानापन्न होऊन मग एखाद्या लहान मुलाच्या निरागसतेने त्या डब्याचे निरीक्षण करू लागला. निमित्त होते, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाने आयोजित केलेल्या नागपूर भेटीचे. दरवर्षी भामरागड तालुक्यातल्या लहान लहान खेड्या-पाड्यांवरच्या आदिवासी स्त्रीपुरुषांना, मुलांना बाहेरचे जग दाखवण्याच्या उपक्रमाचे. भामरागड तालुक्यातल्या कोडपे व तिरकामेटा या दोन अति दुर्गम गावातील हे ३५ आदिवासी स्त्री पुरुष प्रथमच बाहेरचे जग अनुभवायला निघाले होते.तीन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी प्रथम सोमनाथला भेट दिली होती. नंतर आनंदवन पाहिले आणि गुरुवारी ते नागपुरात दाखल झाले होते.मेट्रो राईड केल्यानंतर त्यांचा दीक्षाभूमीला जाण्याचा प्लॅन होता. ते आटोपल्यावर मध्यवर्ती संग्रहालय, झिरो माईल, रेल्वेस्टेशन, बसस्टँड, नारायण स्वामी मंदिर असे नागपूर दर्शन घेऊन ते परतीच्या प्रवासाला लागणार होते. यात ७-८ वर्षाच्या शाळकरी मुलापासून ते साठी गाठलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. चार स्त्रियाही होत्या.दूरदूरपर्यंत दिसणाºया उंच इमारती, मधल्या भागात असलेली वनराई आणि मध्येच दिसणारं एखादं नवलाईचं दृश्यं. हे सगळं निरखत या बांधवांची मेट्रो राईड सीताबर्डी स्थानकावर पोहचली. डब्यामधून बाहेर पडताना गोंधळ, धक्काबुक्की नाही.. कर्कश्श शिट्ट्या नाहीत आणि हो, तंबाखूच्या पिचकाºयाही नाहीत. सगळं शांततेत आणि शिस्तीत. सीताबर्डी स्थानकावर काही काळ व्यतीत करून पुन्हा परतीच्या गाडीने साऊथ एअरपोर्ट स्टेशन गाठले. यातल्या एखाद दुसºयाने रेल्वे पाहिली होती. पण बाकीच्यांसाठी रेल्वे ही विमानाहून कमी नव्हती. दरम्यान विमानतळ परिसरातून जाताना, उडणारे विमानही त्यांना पाहता आले. नागपूर मेट्रोच्या राईडने सुखावलेले, आनंदलेले हे बांधव मग दीक्षाभूमीकडे रवाना झाले.

टॅग्स :Metroमेट्रो