लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम नागपुरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.गडकरींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारात चांगलाच जोर धरला होता. बैठका, सभा, समाजाचे मेळावे आणि प्रत्येक विधानसभानिहाय रॅली काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पश्चिम नागपुरातून भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. रामनगर चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, आमदार सुधाकर देशमुख, नगरसेविका माया इवनाते, परिणिता फुके, माजी नगरसेविका राजश्री जिचकार, संजय भेंडे, भूषण शिंगणे यांच्यासह पश्चिम नागपुरातील सर्व भाजपाचे नगरसवेक सहभागी झाले होेते. पांढराबोडी चौक, रविनगर चौक, फुटाळा चौक, हजारीपहाड, गंगानगर, फ्रेड्सकॉलनी, गिट्टीखदान चौक, बोरगाव चौक, पेन्शननगर चौक, अवस्थीनगर चौक, झिंगाबाई टाकळी, फरस चौक, मानकापूर चौक, छावनी चौक, गड्डीगोदाम चौक, सदर चौक आदी ठिकाणी रॅलीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी हात उंचावून गडकरींना प्रतिसाद दिला. त्यांनी दोन्ही हात जोडून जनतेचे अभिवादन स्वीकारले. काही चौकांमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना औक्षण केले. काही ठिकाणी थंड पाणी, ताक आणि पेढेही वाटण्यात आले. रॅलीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथावर गडकरींसह स्थानिक नगरसेवक होते. त्यांच्या मागे मोठ्या संख्येने दुचाकीस्वार भाजपाचा झेंडा घेऊन घोषणा देत, नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन क रीत होते. रॅलीचा समारोप धरमपेठेतील ट्रॅफिक पार्क चौकात झाला.
पश्चिम नागपुरात गडकरींनी केले शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:04 PM
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम नागपुरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.
ठळक मुद्देरॅली काढून जनतेला केले आवाहन