शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

बनावट नोटा छापणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:07 AM

अर्धवट छापलेल्या नोटा जप्त: गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन ...

अर्धवट छापलेल्या नोटा जप्त: गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या पथकाने शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

नीलेश राजू कडवे (वय २४, रा.समतानगर, कपिलनगर) आणि मारूफ खान रफीक खान (वय २४, रा.ताजनगर, टेका पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.

या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर शिव मंदिरजवळ राहणारे संजय श्रीवास यांच्याकडे भाड्याने रूम घेतली. तेथे त्यांनी १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या बनावट नोटा छापणे सुरू केले. छोट्या किमतीच्या नोटा असल्यामुळे त्यांचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना शनिवारी रात्री बनावट नोटाच्या कारखान्याची टीप मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री ८.३०च्या सुमारास आरोपींकडे छापा घातला. यावेळी ते १००च्या बनावट नोटा छापताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कलर प्रिंटर आणि इंक टॅंक, तसेच एका साइडने छापलेल्या शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या बनावट चलनी नोटा (ज्या एका बाजूने छापल्या आहेत), त्याचप्रमाणे शाईचे डब्बे, बॉटल, कटर मोजमाप पट्टी, मार्कर, पेन, तसेच टेक असा एकूण १ लाख, २८ हजार, ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर, दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली. ही कारवाई रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. त्यानंतर, आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा ४ जूनपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे नेतृत्वात सहायक निरीक्षक परतेकी, उपनिरीक्षक संदीप काळे, लक्ष्मीछाया तांबुसकर, उपनिरीक्षक मोहेकर, झाडोकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

---

अनेक नोटा चलनात

आरोपींनी गेल्या तीन महिन्यांत लाखोंच्या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत.

---

चोरीचेही गुन्हे

हे भामटे चोरटेही आहेत. त्यांनी गिट्टीखदान, तसेच प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केले असून, प्राथमिक तपासात त्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे.

---