लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार ६ फेब्रुवारी ते सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंत श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा प्रगटदिनोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी संतश्रेष्ठ गजानन महाराज यांना लघुरुद्राभिषेक करण्यात येईल. बुधवारी सकाळी ७.३० वाजता रथयात्रेचा शुभारंभ डॉ. विलास डांगरे यांचे हस्ते व भाजपा शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, श्रद्धास्थानचे संयोजक गिरीश वराडपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. गुरुवारी सकाळी ९ वाजता संतकवी कमलासुत रचित श्री संत गजानन अवतरणिकेचे सामूहिक पारायण होईल. दुपारी १ वाजता वंदनाताई वराडपांडे स्मृती भजन स्पर्धा होणार असून संध्याकाळी ४ वाजता कांचन गडकरी यांच्या हस्ते व महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होईल . संध्या ६ वाजता पंचररीक्रमा व मंगल आरती होईल. शुक्रवारी सकाळी १० वाजता श्री महाशक्ती अनसूयामाता चरित्रग्रंथाच्या १४ व्या आवृत्तीचे प्रकाशन केले जाईल. दुपारी १ वाजता भावना वराडपांडे स्मृती शालेय विद्यार्थ्यांची समूह नृत्यगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते, आ. नागो गाणार यांचे प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होईल. संध्या ७ वाजता भक्तीस्वरश्री हा संगीतमय कार्यक्रम निरंजन बोबडे आणि संच सादर करतील. शनिवारी सकाळी ९ वाजता सामूहिक रामरक्षा व मारुतीस्तोत्र पठण तर दुपारी २ वाजता भक्तीस्वरांजली कार्यक्रम सादर होईल. संध्याकाळी ७ वाजता अभंगांचा कार्यक्रम श्रुती पांडवकर आणि संच सादर करतील .रविवारी सकाळी १० वाजता नि:शुल्क रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता जय जय विठ्ठल गजरी हा कार्यक्रम संगीतकार गिरीशजी वराडपांडे आणि संच सादर करतील .सोमवारी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणपूजन , गोपालकाला, दहीहांडी व दुपारी २ ते ७ महाप्रसाद वितरित करण्यात येईल.
नागपुरात उद्यापासून गजानन महाराज प्रगट दिनोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:13 PM
रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार ६ फेब्रुवारी ते सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंत श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा प्रगटदिनोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे नि:शुल्क रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन