नागपूर : फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने ही कारवाई केली.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारानगर येथील संगम फार्महाऊस येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुरुवारी रात्री एक वाजता तेथे धाड टाकली असता तेथे १७ जण जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांनी प्रितम गजानन नागदिवे (३५, पिवळी नदी), विक्रांत विजय कंगाले (३९, भिलगांव), प्रकाश गजानन नागदिवे (४५, पिवळी नदी), गणेश ताराबहादुर राणा (४४, भिलगांव), गुणवंत आनंदरावजी माकडे (४०, भिलगांव), सुरेश प्रल्हाद सहारे (५०, भिलगांव), नितीन शंकरराव बरबटकर ( ४०, पिवळी नदी), स्वप्नील पुंडलीक गुडधे (३१, लष्करीबाग), चंद्रशेखर काशीनाथ मथुरे (४९, भिलगांव), प्रकाश गणपतरावजी भलावी ( ४५, भिलगांव), सिध्दार्थ बाबुराव नागदिवे (३५, पिवळी नदी), अक्षय क्रिष्णाराव मडावी (२२, ऋषीकेश टाऊन, यशोधरानगर), सुशील दिलीपराव शिंदे (३२, भिलगांव), अनिकेत मोहनदास कुंभरे (२८,लष्करीबाग), अमरेंद्रसिंग महेश्वरसिंग (४५,भिलगांव), प्रकाश चंद्रभान मुंडले (३८, उप्पलवाडी) व मोहन बापुराव माकडे (५२, भिलगांव) हे तेथे होते. त्यांच्या ताब्यातून पाच मोटारसायकल, तीन कार व रोख असा २५.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव,अरूण चांदणे, रविकुमार शाहु, रविंद्र गावंडे, योगेश ताथोड, विवेक दोरशेटवार, विजय गिते व शारीक खान यांच्या पथकाने ही कारवाई केली.