लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पाेलिसांच्या पथकाने काेलाबर्डी परिसरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली आणि १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम, माेबाईल हॅण्डसेट, माेटरसायकली असा एकूण १ लाख ८३ हजार १८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपी जुगाऱ्यांमध्ये मनाेज कुंजीलाल राय, धीरज शेषराव साेमकुवर, शुभम धनराज ठाकरे, पुरुषाेत्तम माराेतराव गजभिये, दीपक ऊर्फ गडबड किशाेर कठाणे, सर्व रा. नरखेड, दिगांबर चव्हाण, शुभम प्रकाश तायवाडे, दाेघेही रा. बेलाेना, ता. नरखेड, राजा सलीम शेख, रा. माेवाड, ता. नरखेड, राजेंद्र रामराव घाेडसे, तिलक चंद्रभान गाेलाईत, विजय गणपत डाखाेळे, सर्व रा. सावनेर, रामेश्वर भाऊराव तागडे, रा. राजनी, ता. काटाेल, आनंद सुरेश साेनी, रा. गणेश वाॅर्ड, पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश, ओमप्रकाश चरणसिंग चव्हाण, रा. उमरी कला, ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.
नरखेड पाेलिसांचे पथक गसतीवर आताना त्यांना नरखेड शहरालगत असलेल्या काेलाबर्डी येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची बारकाईने पाहणी केली. तिथे जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट हाेताच धाड टाकली आणि जुगार खेळणाऱ्या १४ जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून २७ हजार ४६० रुपये राेख, ७८ हजार २०० रुपये किमतीचे १० माेबाईल हॅण्डसेट, ७५ हजार रुपये किमतीच्या तीन माेटरसायकली व २,५२५ रुपयांचे जुगार खेळण्याचे व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८३ हजार १८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काेलते करीत आहेत.