लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. प्रत्येकजण गणेशाच्या स्थापनेसह श्रीच्या भक्तीत दंग होण्यास आतूर आहे. शनिवारी सकाळपासून गणरायाच्या स्थापनेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.४० पासून सायंकाळपर्यंत विघ्नहर्त्याची स्थापना करता येईल. ज्योतिषाचार्यानुसार या तिथीत चंद्रदर्शन करू नये.पंडित उमेश तिवारी यांच्यानुसार २२ ऑगस्टपासून भगवान गणेशाच्या आराधनेचे पर्व गणेशोत्सव प्रारंभ होत आहे. शनिवार, २२ ऑगस्टला सकाळी ११.४० वाजता उत्सव मुहूर्त राहील. त्यानंतर दुपारी १.३५ पासून दुपारी ४.३५ पर्यंत लाभ अमृत मुहूर्त आहे. त्यानंतर सायंकाळी ५.४० पासून ६.१० पर्यंत लाभ मुहूर्त आहे. २२ऑगस्टला रात्री ९.२४ पासून ९.४६ पर्यंत चंद्राचे दर्शन करू नये. भक्त सुविधेनुसार गणेश स्थापना करू शकतात. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त श्रीचा अभिषेक, पूजा आणि आरती होणार आहे. पण कोरोना संसर्गामुळे मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश राहणार नाही.
शुभमुहूर्तावर विराजमान होणार गणराया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:44 IST
गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. प्रत्येकजण गणेशाच्या स्थापनेसह श्रीच्या भक्तीत दंग होण्यास आतूर आहे. शनिवारी सकाळपासून गणरायाच्या स्थापनेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.४० पासून सायंकाळपर्यंत विघ्नहर्त्याची स्थापना करता येईल.
शुभमुहूर्तावर विराजमान होणार गणराया
ठळक मुद्दे प्रथमपूज्य दहा दिवसीय गणेशोत्सव शनिवारपासून