गणधराचार्य कुंथुसागरजी गुरुदेव
यांचा आंतरराष्ट्रीय अमृत महोत्सव ३० पासून
उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, साधुसंत होणार सहभागी
नागपूर : गणधराचार्य भारत गौरव कुंथुसागरजी गुरुदेव यांचा आंतरराष्ट्रीय अमृत महोत्सव ३०, ३१ डिसेंबर २०२० आणि १ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सारस्वताचार्य देवनंदीजी गुरुदेव, राष्ट्रसंत युवाचार्य गणधरनंदीजी गुरुदेव, दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदीजी गुरुदेव यांनी सोमवारी व्हर्च्युअल ऑनलाईन पत्रकार संमेलनात ही माहिती दिली. टीव्ही चॅनलसोबत सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
आचार्य गुप्तिनंदीजी गुरुदेव यांनी पत्रकार संमेलनात सांगितले की, ३० डिसेंबरला सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७५ तीर्थ, ७५ जिन मंदिर, ७५ गृह चैत्यालयात सामूहिक महामस्तकाभिषेक होईल. दुपारी १२ ते ४ दरम्यान ७५ महिला मंडळ, ७५ नवयुवक मंडळ आणि बालिका मंडळातर्फे गुरुवंदना, गणधर आचार्य विधान होईल. सर्वजण आपल्या घरूनच आचार्यश्रींची वंदना करू शकतात. सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत महाआरती, ‘आज की शाम गणधराचार्य के नाम’ सांस्कृतिक कार्यक्रम होतील. युवाचार्य गुणधरनंदीजी गुरुदेव यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत श्री जी यांचा महामस्तकाभिषेक, महाशांतीधारा होईल. दुपारी १२ पासून सायंकाळी ५ पर्यंत सर्वधर्म गुरुवचनामृतात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिडला, धर्माधिकारी पद्मभूषण राजर्षी वीरेंद्र हेगडे, योगगुरू बाबा रामदेव, आचार्य सम्राट शिवमुनी म. सा., डॉ. लोकेश मुनी, श्री श्री रविशंकर, ब्रह्माकुमारी परिवाराच्या बी. के. शिवानी दीदी, सिद्धेश्वर स्वामी बीजापूर, जगद्गुरु श्री श्री श्री वचनानंद स्वामीजी पंचमाशाली जगद्गुरू पीठ परिहर, आचार्यश्री विजयरत्नसुंदर सुरीश्वर म. सा, राष्ट्रसंत ललितप्रभ म. सा, चंद्रप्रभ म. सा, साध्वी ऋतंभरा आदी उपस्थित होतील. सायंकाळी ७ पासून नववर्ष अमृत महोत्सव, कलावंतांतर्फे रंगारंग कार्यक्रम आणि नववर्ष स्वागत महोत्सव होईल. भजन सम्राट अनुप जलोटा, भजन गायक रूपेशकुमार हे भजन सादर करतील. सारस्वताचार्य देवनंदीजी गुरुदेव यांनी सांगितले की, १ जानेवारीला सकाळी सात ते नऊपर्यंत श्री जी यांचा महामस्तकाभिषेक, दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत गुरुकृपा विनयांजली दर्शन, नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर शताधिक दिगंबर जैनाचार्य, हजारो मुनीराज, गणिनी आर्यिका, आर्यिका माताजी, ऐलक, क्षुल्लक, क्षुल्लिका माताजी यांचे सोबतच दिव्य दर्शन होऊन आशीर्वचन होतील. सायंकाळी ६.३० पासून रात्री ८.३० पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. पत्रकार संमेलनात आचार्य लोकेश मुनीजी, संतोष जैन पेंढारी, नितीन नखाते, रमेश उदेपूरकर, ललित पाटणी, प्रकाश अजमेरा, सुनील काला, पवन पाटणी, वत्सल जैन, महावीर पाटणी, भरतकुमार काला, दिलीप राखे उपस्थित होते.
............