लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह प्रशासन आणि पोलीस रस्त्यांचे विघ्न बघून चिंतेत होते. परंतु विघ्नहर्ता म्हणविणाऱ्या गणरायाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना संयम, पोलीस व प्रशासनाला नियोजनाची बुद्धी दिली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून येत्या १० दिवस चैतन्यरुपी सुमनांचा सुगंध पसरवण्यासाठी बाप्पा घरोघरी, सार्वजनिक मंडळात विराजमान झाले.गुरुवारी बाप्पाच्या आगमनाने शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील रस्त्यावर, बाजारपेठेत एकच लगबग होती. विदर्भात मूर्ती विक्रीचे प्रसिद्ध ठिकाण असलेली चितारओळ गणेशभक्तांनी सकाळपासूनच खचाखच भरली होती. डोक्यावर फेटे, भगव्या टोप्या, हातात टाळ आणि मुखातून गणरायाचा जयजयकार असे भक्तिमय उत्साहाचे वातावरण येथे अनुभवायला मिळाले. गुलालाची उधळण, ढोल ताशांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी चिमुकल्यांची लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर गणपती बाप्पा मोरया ऽ ऽ ऽ, एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करीत होते. बाजारपेठेचा परिसर उत्साहाने भरून गेला होता. काही बाप्पा वाद्यांच्या मिरवणुकीतून वाजत गाजत, काही मोटारसायकलवर, काही कार, आॅटोत स्वार होत घरोघरी, मंडळाच्या मंडपात, रात्री उशिरापर्यंत विराजमान झाले.शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेतला पोलिसांनी वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन केले होते. गांधीबाग, चितारओळ, महाल, इतवारी, या परिसरात मेट्रोचे काम झपाट्याने सुरू आहे. ४० टक्के रस्ता या कामाने वेढलेला आहे. तरीसुद्धा चितारओळ परिसरात वाहनांची दाटी पोलिसांनी होऊ दिली नाही. रस्त्यावरचे ट्रॅफिक मॅनेजमेंट, डायव्हर्शन पॉर्इंट, पेट्रोलिंग आॅन रोड आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी चांगले प्लॅनिंग दिसून आले. येणाºया आणि जाणाºया वाहनांचे एन्ट्री पॉर्इंट फिक्स करण्यात आले होते. मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून, मेट्रोवाल्यांचे सहकार्य घेण्यात आले. वाहतूक पोलिसांबरोबरच तहसील, कोतलवाली ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची मदत घेण्यात आली. वाहतुकीबरोबरच, लॉ अॅण्ड आॅर्डर कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची कुमक परिसरात तैनात होती. काही मंडळांना आदल्या दिवशीच मिरवणुकी काढण्याची विनंती पोलिसांनी केली होती. त्यामुळे परिसरातील वाहनांचा मोठा भार कमी झाला होता. त्यामुळे एरवी होणारे ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, वाहनचालकांचा होत असलेला त्रागा यावेळी पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे झाला नाही.ढोल ताशांचा दमपोलीस विभागाने गणपतीच्या मिरवणुकीत डीजेवर बंदी घातल्याने, चितारओळीसह संपूर्ण शहरात विविध शहरातून बँड पथक पोहचले होते. विदर्भात सर्वात मोठा गणेश उत्सव हा नागपुरात साजरा होता. शहरात १३०० हून अधिक गणेश मंडळ असल्याने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यासाठी हे पथक शहरात वेगवेगळ्या भागात तैनात होते. डीजेवर बंदी आणल्याने या पथकांना गणेश मंडळांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. नागपूरसह अमरावती भागातील बाभुळगाव, धामणगाव, वर्धा, हिंगणघाट, चिमूर, पांढुर्णा येथून मोठ्या संख्येने बँड पथके आली होती. जागोजागी ही पथके ताल धरून वाजवित होती व कुणी आॅर्डर दिला तर त्यांच्या मिरवणुकीत वाजवायला जात होती. त्यांच्या तालासुरातील वाद्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.बाप्पाची आकर्षक रूपेगणपती ही अशी देवता आहे, जी कुठल्याही रूपात आकर्षकच दिसते. त्यामुळे गाजलेल्या सिनेमातील पात्र, देव आणि संतांच्या वेगवेगळ्या रूपात गणराजाला मूर्तिकारांनी घडविले होते. सार्वजनिक मंडळांनी भगवान शंकराच्या वेगवेगळ्या रूपात गणरायाला साकारण्यास पसंती दर्शविली. बालगणेश, शिवाजी महाराज, साईबाबा आणि अष्टविनायक ाचे हुबेहुब रूपात बाप्पा मूर्तिकारांनी घडविले होते.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेधले लक्षआपला गणपती आणि आपले मंडळाचा वेगळेपणा जपण्यासाठी गणेश मंडळांच्या सदस्यांच्या वेशभूषा लक्ष वेधून घेत होत्या. मंडळाच्या नावाचे टी-शर्ट काहींनी छापून घेतले होते. काही मंडळांनी शुभ्र वस्त्र आणि भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. काही मंडळाचे सदस्य पारंपरिक वेशभूषेत, हातात टाळ घेऊन गणरायाचा गजर करीत होते. या वेशभूषांमुळे बाप्पाच्या मिरवणुकीत वेगळेपण दिसून आले. मंडळातर्फे वेशभूषेबरोबरच, मिरवणुकीसाठी बाप्पाच्या वाहनांचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती.सर्वत्र उत्साह आनंद आणि लगबगबाप्पाच्या आगमनामुळे येत्या दहा दिवस चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह तेवढाच जोशात होता. बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी अख्खे कुटुंब बाजारात आले होते. चितारओळीच्या गर्दीतून गणपतीबरोबर दोन चिमुकल्यांना हातठेल्यावर बसून आई-बाबा ठेला ओढत होते. यावेळी या कुटुंबाच्या चेहऱ्या