प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देवदूतांनो! जर स्वर्गात गेल्यावरही पुण्याच्या स्तरानुसार फळ मिळत असल्याने मत्सर शिल्लकच राहत असेल, जर पुण्य संपल्याक्षणी त्याला खाली ढकलून दिल्या जात असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेथे केलेल्या कर्माचे फळ मिळणार नसेल तर अशा तुमच्या स्वर्गात राहण्यापेक्षा माझी ही भारतभूमी पवित्र आहे. मी येथेच राहील, असे थेट देवदूतांना सांगून स्वर्गाचे विमान परत करणारी भारतीय इतिहासातील अद्वितीय विभूती म्हणजे श्री मुद्गल आचार्य. भगवान श्री गणेशांच्या हातातील मुद्गल श्री सूर्य रूपात प्रगट होतो. सूर्याचे काम आहे अंधकार दूर करणे, तर मुद्गलाचे काम आहे प्रत्येक गोष्टीचे चूर्ण करणे. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करून श्री गुरु मुद्गलाचार्यांचे कार्य चालते. श्री गुरु-शिष्यांच्या अज्ञानरूपी अंधकाराला दूर करतात आणि त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अहंकारादिक सगळ्या विकृतींचा चुराडा करतात. त्यामुळे भगवान मुद्गल हे मुदगरांश म्हणून शोभून दिसतात. मुद म्हणजे आनंद आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि विचारातून आनंद ओसंडून वाहतो त्यांना मुद्गल असे म्हणतात. दक्ष यज्ञ विनाशाच्या वेळी मस्तक कापलेल्या दक्षाला नंतर बोकडाचे डोके बसवण्यात आले त्यावेळी आत्मविस्मृत झालेल्या दक्षाला महर्षी मुद्गलांनी केलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. भगवान गणेशांना यथार्थरीतीने समजून घ्यायचे असेल तर श्रीमुद्गलपुराणाला पर्याय नाही. मानवाला आपल्या जीवनात परम आनंदी होण्याचा अंतिम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण. या महर्षी मुद्गलांचा आश्रम नागपूरजवळील अदोष (अदासा) क्षेत्रावर होता. येथे श्री मुद्गलांनी पूजिलेले भगवान श्री शमीविघ्नेश आजही जगाला आनंद देण्यासाठी विराजमान आहेत.
Ganesh Chaturthi 2018; ‘गाणपत्य आचार्य परंपरा’ ; भगवान श्रीमुदगलाचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 9:34 AM
केलेल्या कर्माचे फळ मिळणार नसेल तर अशा तुमच्या स्वर्गात राहण्यापेक्षा माझी ही भारतभूमी पवित्र आहे. मी येथेच राहील, असे थेट देवदूतांना सांगून स्वर्गाचे विमान परत करणारी भारतीय इतिहासातील अद्वितीय विभूती म्हणजे श्री मुद्गल आचार्य.
ठळक मुद्देमुद म्हणजे आनंद आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे