Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; गणेशपुराण वक्ता महर्षी भृगु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:36 AM2018-09-19T09:36:02+5:302018-09-19T09:36:51+5:30

भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार रूपाला समजून घ्यायचे तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण.

Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition | Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; गणेशपुराण वक्ता महर्षी भृगु

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; गणेशपुराण वक्ता महर्षी भृगु

googlenewsNext

प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार रूपाला समजून घ्यायचे तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण. तसेच भगवान गणेशांच्या सगुण साकार रूपाला, कथात्मकरीतीने समजून घेण्याचा सुंदर मार्ग आहे श्री गणेशपुराण. या गणेशपुराणाचे वक्ता आहेत महर्षी भृगु. रुक्मांगद नावाच्या राजाला त्याच्या दु:खनिवृत्तीसाठी महर्षी भृगुंनी केलेला उपदेश म्हणजे श्री गणेशपुराण. श्री गणेशपुराणात उपासना खंड आणि क्रीडा खंड, असे दोन भाग आहेत. उपासना खंडात विविध गणेश क्षेत्रांची माहिती, चतुर्थीचा महिमा, दुर्वांचा महिमा तथा गणेशनामाचा महिमा असे विषय आहेत. तर क्रीडा खंडांमध्ये कृतयुगातील विनायक, त्रेतायुगातील मयुरेश्वर आणि द्वापर युगातील गजानन या गणेशांच्या अवतारांच्या विविध कथा वर्णिल्या आहेत. या महर्षी भृगुंना गाणपत्य संप्रदायात श्री गुरु असे संबोधिले जाते. त्यांचाच कलियुगातील अवतार म्हणून श्री ब्रह्मानंद योगिंद्रांचे वंदन केले जाते. या विविध कथांच्या माध्यमातून श्रीगणेशांच्या भक्तीची विविध रहस्ये महर्षी भृगुंनी उलगडून दाखविली असल्याने महर्षी भृगुंचे गणेशभक्तांवर थोर उपकार आहेत. हे गणेशपुराण श्रीक्षेत्र रांजणगावला सांगितले गेले.

Web Title: Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.