Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आद्यकलियुगाचार्य महर्षी गिरिजासुत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:33 AM2018-09-20T09:33:16+5:302018-09-20T09:33:46+5:30

पंचकात वर्णन केलेले श्री वेदव्यास कलियुगाचा आरंभी श्री गिरिजासुत रूपात अवतीर्ण होत असतात, असे गाणपत्य संप्रदाय सांगतो.

Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition | Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आद्यकलियुगाचार्य महर्षी गिरिजासुत

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आद्यकलियुगाचार्य महर्षी गिरिजासुत

Next

प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
पंचकात वर्णन केलेले श्री वेदव्यास कलियुगाचा आरंभी श्री गिरिजासुत रूपात अवतीर्ण होत असतात, असे गाणपत्य संप्रदाय सांगतो. देवी पार्वतीने गणेश उपासना करून निर्माण केलेले स्थान आपण लेण्याद्री या नावाने ओळखतो. येथे भगवान गणेश गिरिजात्मज नावाने विराजमान आहेत. त्यांच्या चरणाशी असलेल्या जुन्नरनामक गावात श्री गणेश्वर शास्त्री आणि देवी महालक्ष्मी या तप:पूत दाम्पत्याच्या उदरी महर्षी गिरिजासुतांचा जन्म झाला. प्रदीर्घ काळ अपत्य नसल्याने या दाम्पत्याने श्री गिरिजात्मजांची जोपासना केली आणि त्यांनी स्वप्नदृष्टांत दिल्यावर जन्माला आलेली ही महान विभूती. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा यांचा प्रकटदिन. आरंभीचे शिक्षण वडिलांच्या जवळ झाल्यावर चैत्र शुद्ध द्वितीयेला श्रीवल्लभेश मंत्राची दीक्षा मिळाली. आपल्या दिव्यतम साधनेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी गणेश विजय नामक एका ग्रंथाची रचना केली; यात आचार, लीला, उपासना आणि ज्ञान अशा चार कांडांची विभागणी पाहावयास मिळते. याशिवाय सर्वसार संग्रह, बालदीक्षा, प्रौढशिक्षा असे ग्रंथही त्यांनी निर्माण केले.
महर्षी गिरिजासुत आणि जगद्गुरु आदिशंकराचार्य यांचा संवाद झाल्याचे वर्णन शंकर दिग्विजयातदेखील आहे. याप्रसंगी केवलाद्वैत सिद्धांत आणि गाणपत्य विचारसरणी एकच असून फरक असेल तर तो केवळ परिभाषांचा आहे, हे श्रीगिरिजासुतांनी श्री आचार्यांच्यासमोर सांगितल्यावर त्यांनी श्री गिरिजासुतांना गाणपत्य प्रचाराचा अधिकार प्रदान केला. त्यानुसार मोरगावला येऊन ब्रह्मभूयमहासिद्धिपीठावर आरूढ होऊन महर्षी गिरिजासुतांनी कलियुगाच्या आरंभी गणेश धर्माची पताका फडकवत ठेवली. माघ शुद्ध पौर्णिमेला स्वानंद गमन केलेल्या गिरिजासुतांनी स्थापिलेल्या स्थानाला सध्या जुन्नरमध्ये महाजनांचा गणपती म्हणून ओळखले जाते.

Web Title: Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.