प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:नवी इतिहासातील प्राचीनतम साहित्य म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदातीलही दुसरे मंडळ सर्वाधिक प्राचीन असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात. या दुसऱ्या मंडळाचे ऋषी आहेत महर्षी गृत्समद. महर्षी वाचन्कवी यांची पत्नी मुकुंदा राजा रुक्मांगदावर भाळली. राजाने तर स्पष्ट शब्दात नकार दिला, पण राजाच्या वेशात येऊन देवराज इंद्राने केलेल्या संगामुळे जन्मलेले दिव्य अपत्य म्हणजे महर्षी गृत्समद. अर्थात या पुराणकथा दिव्य आध्यात्मिक गूढार्थाने भारलेल्या असतात. मुकुंदा म्हणजे बुद्धी, ती बुद्धिपतीला म्हणजे मोरयाला सोडून रुक्मांगदावर म्हणजे संसारावर भाळते आणि मग जीव जन्माला येतो. असा आध्यात्मिक अर्थ या कथेचा आहे. या महर्षी गृत्समदांनी आत्मोन्नतीसाठी गणेश उपासना केली आणि पुढे जाऊन भगवान गणेशांच्या ‘गणानांत्वा’ या मंत्राचे ऋषित्व त्यांना प्राप्त झाले. महर्षी गृत्समदांनी कापसापासून वस्त्र निर्माण करण्याचा शोध लावला. गुणाकार आणि भागाकार या त्यांनी जगाला दिलेल्या देणग्या. यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचे निवासी असणाऱ्या महर्षी गृत्समदांना गाणपत्य संप्रदायात मोठे आदराचे स्थान आहे.
Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; महागाणपत्य महर्षी गृत्समद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 9:37 AM