लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई...’ या भजनातून दिवस-रात्र पूजापाठ, आरती केल्याने देव भेटणार नाही. देव शिक्षण घेतल्याने, उद्योग केल्याने आणि स्वच्छतेत भेटेल. रक्तदान करा, नेत्रदान आणि अवयवदान करा. मिश्किल शैलीतील आपल्या चिरपरिचित अंदाजात अध्यात्माच्या नावाने पसरलेल्या बुवाबाजीपासून ते राजकारणापर्यंत आणि महिला अत्याचारापासून अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार करीत त्यांनी उपस्थित भाविकांना खळखळून हसवितानाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.महाल येथील श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गुरुवारी सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. गणरायाच्या आराधनेनंतर ‘भाई भज भज गुरु के नाम...’ या भजनाने त्यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. ‘मी तुम्हाला पाच हजार वर्षांच काही सांगत नाही. मी आजची परिस्थिती सांगतो. मला मोह तुकडोजी बाबा, गाडगे बाबांच्या विचारांचा आहे. मी ५२ वर्षांत १४ हजार गावात कीर्तन केले’, असे सांगत त्यांनी धर्मकारण, समाजकारण व राजकारणावर प्रबोधन केले. कुटुंब एकत्रित यावे, आपण संघटित व्हावे, स्वत:पेक्षा समाजाचा, देशाचा विचार करावा, यासाठी या मंडळाच्या तरुणांनी ९९ वर्षांपासूनची परंपरा जोपासली आहे. सर्व जातीपातीचे लोक एकत्र आले. तरुणपिढी भलतीकडेच आॅनलाईन झाली आहे. महापुरुषांच्या विचारांनी एकमेकांसोबत आॅनलाईन असणारे समाज घडवितात. धर्म-अध्यात्माच्या नावाने सामान्य माणसांना मूर्ख बनविले जात आहे, महिलांचे शोषण केले जात आहे, असे सांगताना ‘हो पुत्रवती, मरो तुझा पती, उद्या लागो रामपालच्या हाती...’असे म्हणत खास त्यांच्याच शैलीत भोंदूबाबांवर टीका केली. स्त्रियांनो ‘चूल आणि मूल’चे दिवस संपले आहेत, घाबरू नका, दुर्गादेवीच्या रूपातील फोटो फेसबुकवर टाका, असे आवाहन त्यांनी केले. ‘देहाची तिजोरी, दारू त्यात ठेवा, उघड बार देवा आता उघड बार देवा...’ या मिश्किल गीतातून व्यसनाधिनतेवर टीका करीत त्यांनी तरुणांना व्यसनापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव हा जीवनाला घडविणारा उत्सव आहे. म्हणून तरुणांनो शिक्षणाचा संक ल्प घ्या, व्यसन सोडा, मुलींची छेड करू नका, असा संदेश त्यांनी दिला.आयोजनात मंडळाचे मार्गदर्शक कृष्णाजी पाठक, विनोद राव, गिरीश पुराणिक, रॉबीन जयपूरकर, रोहित पागे, लखन हिवसे यांच्यासह संजय राव, मधुकर पौनीकर, विवेक धाक्रस आदींचा समावेश होता.
Ganesh Festival 2018: सच्चा धर्म नही जाना तुने रे भाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:21 AM
माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई...’ या भजनातून दिवस-रात्र पूजापाठ, आरती केल्याने देव भेटणार नाही. देव शिक्षण घेतल्याने, उद्योग केल्याने आणि स्वच्छतेत भेटेल. रक्तदान करा, नेत्रदान आणि अवयवदान करा. मिश्किल शैलीतील आपल्या चिरपरिचित अंदाजात अध्यात्माच्या नावाने पसरलेल्या बुवाबाजीपासून ते राजकारणापर्यंत आणि महिला अत्याचारापासून अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार करीत त्यांनी उपस्थित भाविकांना खळखळून हसवितानाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
ठळक मुद्देसत्यपाल महाराजांनी केले अंतर्मुख : दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाचे आयोजन