शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Ganesh Festival : नागपुरात अडचणीमुळे ६८० गणेश मंडळांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 9:57 PM

गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात परवानगीच्या मार्गातील अडथळे दूर न झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत ६८० गणेश मंडळांनाच अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात आल्याची महिती आहे.

ठळक मुद्देमनपाच्या एक खिडकी योजनेचा उडाला फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात परवानगीच्या मार्गातील अडथळे दूर न झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत ६८० गणेश मंडळांनाच अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात आल्याची महिती आहे. वास्तविक गेल्या वर्षी ९५० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली होती.आॅनलाईन प्रक्रियेत अनेक अडचणी आल्याने महापालिकेच्या झोन कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास परवानगीसाठी काही झोनमध्ये गर्दी होती. त्यामुळे परवानगीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी महापालिका मुख्यालयातील अग्निशमन विभागाच्या तळघरात सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु यावेळी नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता झोन स्तरावर व्यवस्था करण्यात आली. परंतु झोन स्तरावर गणेश भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अ‍ॅप पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे यावरून अर्ज करता आले नाही.अग्निशमन केंद्र            प्राप्त अर्जसिव्हील लाईन               २१५लकडगंज                     ६२कॉटन मार्केट               १०३गंजीपेठ                        ८५सुगतनगर                     ३५सक्करदरा                   ५९कळमना                      ४६नरेंद्रनगर                     ७५अखेर गांधीबाग झोनमध्ये कारवाईप्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बाजारात विकण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत. मात्र मूर्ती विक्रेत्यांकडून त्याचे पालन होत नसतानाही उपद्रव शोध पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र सर्वाधिक मूर्ती विक्री होत असलेल्या गांधीबाग झोन क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कुणावरही कारवाई न झाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच बुधवारी गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ८५ विक्रे त्यांवर कारवाई करून ३० हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.२१७ दुकानांची तपासणीबुधवारी महापालिकेच्या सर्व झोनमध्ये एकूण २१७ दुकानांची तपासणी करण्यात आली. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मूर्ती विक्रे त्यांवर ७६ हजार ८०० रुपये दंड आकारला. यात आसीनगर झोनमध्ये २६ दुकानांची तपासणी करून ९ हजार दंड ,धरमपेठ १७ दुकाने तपासून १२ हजार दंड, धंतोली २५ दुकानांची तपासणी करून ६ हजार दंड,नेहरूनगर १४ दुकानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. लकडगंज झोनमध्ये २५ दुकानांची तपासणी करून एक हजार दंड आकारला , आसीनगर झोनच्या पथकाने १० दुकानांची तपासणी करून ४ हजारांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनमध्ये १५ दुकानांची तपासणी करून ९ हजार रुपये दंड आकारला.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८