शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

गणेशोत्सव झाले हायटेक; परवानगीसाठी वापरा अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:58 AM

गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती थांबणार आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या महानगरपालिकेचे पाऊल’एनएमसी गणेशोत्सव २०१८ अ‍ॅप’चे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती थांबणार आहे.गणेशोत्सवाच्या मंडपासाठी महापलिकेच्या झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र या परवानगीसाठी चांगलीच भटकंती व्हायची. अनेकदा मनस्तापही सहन करावा लागायचा. हा त्रास कमी झाल्याने गणेश मंडळांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानगी या एकाच अ‍ॅपवरुन मिळविता येणार आहेत.

ई-मेलवर मिळणार माहितीपरवानगीसाठी मंडळाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर परवानगीची प्रक्रिया सुरू होईल. अ‍ॅपवर नोंदणी करून विविध प्रकारची माहिती सादर केल्यानंतर झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक आयुक्त यांच्याकडे ही माहिती जाईल. यानंतर सहायक आयुक्त सर्व कागदपत्रांची पडताळणी करून सदर अर्ज मंजूर अथवा नामंजूर करू शकतात. याबाबतची माहिती अर्जदाराला ई-मेलद्वारे पाठविली जाईल. यानंतर झोन स्तरावर मनपाने सुरू केलेल्या एक खिडकी योजनेच्या खिडकीवर जाऊन गणेश मंडळांना या माहितीच्या पीडीएफ प्रिंटसह इतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर येथून गणेश मंडळांना परवानगीचे पत्र मिळणार आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव