लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बाजारात विकण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत. मात्र मूर्ती विक्रेत्यांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. याचा विचार करता उपद्रव शोध पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र सर्वाधिक मूर्ती विक्री होत असलेल्या गांधीबाग झोन क्षेत्रात गेल्या तीन दिवसात २५ दुकांनाची तपासणी करण्यात आली. परंतु एकाही विके्र त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. वास्तविक या झोनमधील विक्रेत्यांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. आतापर्यंत १० झोनमधील ३१६ दुकानांची तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रे त्यांकडून ९७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.महापालिकेच्या पथकांनी ८, १० व ११ सप्टेंबरला पीओपी मूर्ती विक्रे त्यांच्या दुकानांची तपासणी केली. दंड वसुलीच्या बाबतीत लक्ष्मीनगर झोनमध्ये ३१ दुकानांची तपासणी करून सर्वाधिक २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनमध्ये १८ हजार, धंतोली झोनमधील ५० दुकानांची तपासणी करण्यात आली. सात हजाराचा दंड वसूल करण्यात आला. नेहरूनगर नऊ हजार, सतरंजीपुरा १६ हजार, लकडगंज पाच हजार, आसीनगर १२ हजार व मंगळवारी झोनमध्ये पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन व गांधीबाग झोनमध्ये मात्र एक रुपयाही दंड वसूल करण्यात आलेला नाही.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईपीओपी मूर्तीचे तलावात विर्सजन करण्याला निर्बंध घालण्यात आले आहे. विक्रे त्यांना पीओपी मूर्तीच्या मागे लाल निशाणी लावणे बंधनकारक केले आहे. याची तपासणी सुरू आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.११ सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली कारवाईझोन दुकानांची तपासणी दंडलक्ष्मीनगर ३१ ३२,०००धरमपेठ १६ १८,०००हनुमाननगर १० ००धंतोली ५० ७०००नेहरूनगर १९ ९०००गांधीबाग १८ ००सतरंजीपुरा १६ १६,०००लकडगंज १० ५०००आसीनगर १३ १२,०००मंगळवारी १५ ५०००
Ganesh Festival: नागपुरात पीओपी मूर्ती विक्रेते सर्वाधिक मात्र दंडात्मक कारवाई शून्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 9:44 PM
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बाजारात विकण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत. मात्र मूर्ती विक्रेत्यांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. याचा विचार करता उपद्रव शोध पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र सर्वाधिक मूर्ती विक्री होत असलेल्या गांधीबाग झोन क्षेत्रात गेल्या तीन दिवसात २५ दुकांनाची तपासणी करण्यात आली. परंतु एकाही विके्र त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.
ठळक मुद्देगांधीबाग झोनमध्ये एकही कारवाई नाही : लक्ष्मीनगरात सर्वाधिक २८ हजार रु. दंड