अंकिता देशकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनाची काळजी असलेल्या शहरातील एका युवकाने दगडांपासून गणेशमूर्ती तयार केली आहे. चंदनसिंग ठाकूर असे या युवकाचे नाव असून, ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.ठाकूर यांनी गेल्यावर्षी मातीपासून गणेशमूर्ती तयार केली होती. परंतु, त्यात काही प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरिस वापरावे लागले होते. त्यामुळे यावर्षी त्यांनी वेणा नदीमधील दगडांचा वापर करून गणेशमूर्ती घडवली. दगडांची निवड करण्यासाठी त्यांना तब्बल एक महिना वेळ लागला. ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरणाचे संरक्षण करणारी आहे. बाजारातून मातीच्या मूर्ती खरेदी केल्या तरी, त्यात पर्यावरणाचे नुकसान करणारे आॅईल पेंट व इतर अनेक घटक असतात. परंतु, ठाकूर यांनी तयार केलेल्या दगडाच्या गणेशमूर्तीमध्ये काहीच हानीकारक नाही. वेगवेगळ्या आकाराचे दगड एकमेकांना चिपकवून मूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीचे दागिनेही दगड व शिंपल्यांपासून तयार करण्यात आले आहेत.पर्यावरण संवर्धनाची प्रेरणापर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्यासंदर्भात समाजात जागृती झाली पाहिजे. ही बाब लक्षात घेता दगडांपासून गणेशमूर्ती तयार केली. ही मूर्ती घरीच विसर्जित करून दगड पुढच्या वर्षीसाठी सांभाळून ठेवू. त्यातून इतरांना पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा मिळत राहील, असे ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
Ganesh Festival 2019: दगडांपासून तयार केली गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:49 AM
नागपूर शहरातील एका युवकाने दगडांपासून गणेशमूर्ती तयार केली आहे. चंदनसिंग ठाकूर असे या युवकाचे नाव असून, ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.
ठळक मुद्देवेणा नदीमधील दगडांचा वापरपर्यावरण संवर्धन