लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात, असे आवाहन केले आहे. त्याची अंमलबजावणी नागपुरातही केली जाईल, असे महापौर संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मंगळवारी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत महापालिकेत बैठक झाली. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते. कोविडची सध्याची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपुरात रुग्णसंख्या दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. अशात आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावेत. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावा. आजच्या परिस्थितीशी निगडित समाजात जनजागृती करणारे आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावे, असेही महापौर जोशी यांनी सांगितले.गणेशोत्सवासाठी अशा आहेत अटी५० लोकांपेक्षा जास्त उपस्थिती नकोगर्दी होणार नाही याची काळजी घ्यासर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे.सर्वांनी मास्क लावावा, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा.श्री गणेशाची स्थापना करताना किंवा विसर्जन करताना मिरवणुका टाळाव्या.गणेशमूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करायचे आहे.
नागपुरात गणेशमूर्ती चार फुटापेक्षा उंच नसावी : महापौरांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 8:41 PM
२२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात, असे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देमिरवणुका टाळा