शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

गणेश विसर्जन : नागपुरात पीसी टू सीपी सारेच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 5:07 PM

घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी थेट रस्त्यावर उतरून स्वत:ही पहाटेपर्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याने नागपुरात गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रविवारी सकाळी ७ वाजतापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील पीसी टू सीपी (पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त) पर्यंत शिस्तीत आणि समंजसपणे कर्तव्य बजावत राहिले.

ठळक मुद्देपोलीसदादा २२ तास अविश्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी थेट रस्त्यावर उतरून स्वत:ही पहाटेपर्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याने नागपुरात गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रविवारी सकाळी ७ वाजतापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील पीसी टू सीपी (पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त) पर्यंत शिस्तीत आणि समंजसपणे कर्तव्य बजावत राहिले.गणोशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरून वाद होतात. हाणामाऱ्या घडतात. अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचीही स्थिती निर्माण होते. यावेळीही अनेक शहरात असे कटू प्रकार घडले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मात्र सुरुवातीपासूनच गणेशोत्सवादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केले होते. १० दिवस बाप्पांचा महाउत्सव पार पडल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची विशेष तयारी केली होती. परिणामी बाप्पांचा महाउत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला.विसर्जनाच्या प्रमुख ठिकाणी फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, कोराडी, कळमना तलाव, महादेव घाट कामठी, वाडी आणि हिंगणा भागातील काही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. वाहतुकीला अडसर निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणांहून वाहतुकीचा मार्ग तात्पुरता वळविण्यात आला होता. मिरवणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहून काही समाजकंटक छेड काढणे, संवेदनशील ठिकाणी दगडफेक करणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळणे असे प्रकार जाणीवपूर्वक करू पाहतात. ते होऊ नये म्हणून रस्त्यारस्त्यावर तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. उपद्रवी व्यक्तींना जेरबंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशा प्रकारे नियोजनपूर्वक बंदोबस्त करण्यात आल्याने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.पोलीस आयुक्त पहाटेपर्यंतरविवारी सकाळी ७ वाजतापासून सात पोलीस उपायुक्तांसह २०० पोलीस अधिकारी आणि १७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या कर्तव्यावर रुजू झाले होते. तब्बल २२ तास ते अविश्रांत कर्तव्यावर होते. त्यातील अनेकांनी जेवणही उभ्या उभ्याच केले होते. विशेष म्हणजे, बंदोबस्ताचे नियोजन करणारे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय स्वत: अनेक विसर्जनस्थळी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करीत होते. दिवसभर फिरून त्यांनी वेगवेगळ्या भागातील रस्त्यावरील बंदोबस्ताची पाहणी केली. विसर्जनासाठी सर्वाधिक गर्दी फुटाळा तलावावर होती. तेथे रात्री ७ नंतर ९ आणि त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता पोलीस आयुक्त आले. गर्दी वाढल्याचे पाहून ते पहाटे ३.४५ वाजतापर्यंत फुटाळा तलावावर हजर होते.

टॅग्स :PoliceपोलिसGanesh Visarjanगणेश विसर्जन