नागपूर : मागील दोन वषानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. इको फ्रेंन्डली गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरातील तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेण्यापूर्वी विसर्जन कुठे करणार याची माहिती द्यावी लागत आहे.
शासन निर्देशानुसार यंदा मंडळांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मनपाच्या झोन स्तरावर परवागीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. शहरात चार फुटापर्यंतच्या मूर्ती विसर्जनासाठी ४०० कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी २७० कृत्रिम टँक लावण्यात आले होते. अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.मनपा क्रेन, वीजेची व्यवस्था करणारसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्याचार फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाची शहरात व्यवस्था नाही. शहराबाहेर कन्हान नदी, कोलार नदी वा अन्य ठिकाणी विसर्जन करावे लागणार आहे. ठिकाणांची निवड मंडळांनाच करावी लागणार आहे. या ठिकाणी महापालिका क्रेन व वीजेची व्यवस्था करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. शहरातील तलावात विसर्जनाला बंदी
विशेष म्हणजे नागपूर मनपाने गांधीसागर, फुटाला, सक्करदरा व सोनेगाव यासह शहरातील प्रमुख १० तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. ४ फुटापर्यंतच्या मूर्ती विसर्जनाची व्यवस्था मनपा करीत आहे. ४ फुटांवरील अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन शहराबाहेर करावे लागणार आहे.अडीच लाख मूर्तींची स्थापना होणार
कोविड संक्रमणापूर्वी वर्ष २०१९ मध्ये सर्वाधिक २ लाख ९२ हजार ७०२ मूर्तींचे कृत्रिम टँक व तलावात विसर्जन करण्यात आले होते. मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना संक्रमणामुळे मूर्तींची संख्या कमी होती. या वर्षात १ लाख २ हजार ७२२ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. २०२१ मध्ये २५ हजार मूर्तींची भर पडली. या वर्षात एकूण १ लाख २७ हजार ७७६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. यंदा २.५० लाखांहून अधिक मूर्तींची स्थापना होईल, असा मनपा प्रशासनाचा अंदाज आहे.परवानगीसाठी एक खिडकी योजना
शासनाकडून गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी गणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागत आहे. यासाठी झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. येथे शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभाग,सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी व मनपा कर्मचारी यांच्या आवश्यक विभागाचे अधिकारी उपलब्ध आहेत.