शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

गणेशोत्सव २०२१; यंदा गणेश चतुर्थीला 'या' सहा ग्रहांचा शुभसंयाेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 8:00 AM

Nagpur News शुक्रवार १० सप्टेंबरला घराेघरी श्रीगणेशाचे आगमन व पूजन हाेणार आहे. या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्लभ याेग बनत आहेत. हे याेग अत्यंत मंगलमय ठरणार असल्याचे ज्याेतिषाचार्य डाॅ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

ठळक मुद्देमूर्ती स्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी ११.०३ पासून दुपारी १.३३ वाजतापर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शुक्रवार १० सप्टेंबरला घराेघरी श्रीगणेशाचे आगमन व पूजन हाेणार आहे. या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्लभ याेग बनत आहेत. हे याेग व्यापारीवर्गाला लाभदायक असून रवियाेग असतानाचे गणेश पूजन अत्यंत मंगलमय ठरणार असल्याचे ज्याेतिषाचार्य डाॅ. अनिल वैद्य यांनी सांगितले. (Ganeshotsav 2021; Good luck of six planets on Ganesh Chaturthi)

नवग्रहातील सहा ग्रह आपल्या सर्वाेत्तम स्थितीत राहणार आहेत. बुध आपल्या स्वराशीत म्हणजे कन्या राशीत राहणार आहे. शुक्र तुला राशीत, राहु वृषभ राशीत, केतू वृश्चिक राशीत, शनि मकर राशीत तर सूर्य सिंह राशीतून भ्रमण करणार आहे. कित्येक वर्षांनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा आणि स्वाती नक्षत्राबराेबर रवियाेग बनणार आहे. आज, दुपारपर्यंत चित्रा नक्षत्र व नंतर स्वाती नक्षत्र राहणार आहे. रवियाेग ९ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता सुरू झाला असून ताे गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२.५७ वाजतापर्यंत राहणार आहे. हा दुर्लभ याेग असताना काेणतेही नवीन कार्याचा आरंभ किंवा गणेश पूजन मंगलकारी राहील.

श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. मात्र सर्वाेत्तम मुहूर्त सकाळी ११.०३ वाजतापासून दुपारी १.३३ वाजतापर्यंत म्हणजे २ तरा ३० मिनिटांपर्यंत असेल म्हणजे यावेळी अभिजित मुहूर्तावर गणेश पूजन करण्याची संधी प्राप्त हाेणार आहे. या दिवशी सकाळी ११.०८ वाजता भद्रा सुरू हाेत असून रात्री ९.५८ वाजतापर्यंत राहिल. ही पातालनिवासिनी भद्रा असून अत्यंत शुभ फलदायी आहे. भद्रचा पृथ्वीवर अशुभ प्रभाव नसताे. त्यामुळे भद्रा काळात गणेश पूजन करण्याचा लाभ व पुण्य मिळेल, असे मत डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव