शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

सुपारी चोरणाऱ्या टोळीला नागपुरात शिताफीने अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:29 PM

डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने जप्त केलेली ४५ लाख रुपयांची सुपारी चोरणारी गँग पोलिसांच्या हाती लागली आहे. कळमना पोलीस ठाणेपरिसरात दरोड्याच्या तयारीत पकडलेल्या गुन्हेगारांनीच कोल्ड स्टोअरेजमधून सुपारी चोरली होती. आरोपींनी चौकशीत याचा खुलासा केला आहे.

ठळक मुद्दे दरोड्यात सापडलेल्या गुन्हेगारांचा खुलासा : १७ लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने जप्त केलेली ४५ लाख रुपयांची सुपारी चोरणारी गँग पोलिसांच्या हाती लागली आहे. कळमना पोलीस ठाणेपरिसरात दरोड्याच्या तयारीत पकडलेल्या गुन्हेगारांनीच कोल्ड स्टोअरेजमधून सुपारी चोरली होती. आरोपींनी चौकशीत याचा खुलासा केला आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री गस्तीवर असताना चिखली येथील रेल्वे क्रॉसिंगच्याजवळ संदिग्ध अवस्थेत असलेल्या सहा लोकांना पकडले होते. तपासणी केली असता त्यांच्याजवळ दोन दुचाकी व दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख रमजान शेख जमीर (४०), मिनीमातानगर, कुलदीप ऊर्फ पायजामा सुभाष गणवीर (२३), न्यू कॉलोनी, राजेश धनराज कठाणे (३२) म्हाडा क्वार्टर, चिखली, सूर्यकांत ऊर्फ जगदीश ऊर्फ जग्गा मारोतराव पिसे (३२), जितेंद्र पुरुषोत्तम पुर्रे (२२), गुलमोहरनगर तसेच अनिल ऊर्फ बारिक कृष्णा साहू (१९), विजयनगर यांना अटक केली होती.दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांना याच आरोपींनी मौदा येथील गोयल कोल्ड स्टोअरेजमधून सुपारी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कडक चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. डीआरआयने काही दिवसांपूर्वी शहरातीत सुपारी व्यापाऱ्यांवर धाडी घातल्या होत्या. सीमा शुल्क न भरता नागपुरात आणलेली २५५ टन सुपारी जप्त केली होती. यापैकी ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरीला गेली होती व याचा खुलासा ८ फेब्रुवारी रोजी झाला होता. डीआरआयचे अधिकारी अनिल कुमार पंडित यांच्या तक्रारीवर मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाहोता व शहर तसेच ग्रामीण पोलीस याचा शोध घेत होते.या टोळीचा सूत्रधार रमजान आहे. डीआरआयच्या धाडीत जप्त केलेली सुपारी कामगारांच्या मदतीने कोल्ड स्टोअरेजमध्ये पाठविण्यात आली होती. रमजान गाड्या चालविण्याचे काम करतो. तो ही या कामात सहभागी होता. याच दरम्यान त्याने सुपारी चोरी करण्याची योजना आखली. शटरच्या आतमध्ये हात टाकून नट बोल्ट खोलून कोल्ड स्टोअरेजमध्ये प्रवेश करता येतो हे त्याच्या लक्षात आले होते. त्याचा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला व त्यानंतर तो वारंवार सुपारी चोरू लागला. रमजानने साथीदारांच्या मदतीने २३१ पोती सुपारी चोरली. पोलिसांनी आरोपींकडून ८९ पोती सुपारी व वाहनांसह १७ लाख रुपयांचा माल हस्तगत केला. यानंतर आरोपींना मौदा पोलिसांकडे सोपविण्यात आले.व्यापाऱ्यांवरही कारवाई आरोपींनी चोरलेली सुपारी सतीश लक्ष्मीनारायण केशरवानी (५९), लालगंज व राहुल गजानन बावनकुळे (२८) भारतनगर, कळमना यांना विकली होती. त्यामुळे या व्यापाऱ्यांनाही ताब्यात घेऊन मौदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. केशरवानी हे मिरची व्यापारी आहेत तर बावनकुळे हे दलाल आहेत. मौदा पोलीस त्यांच्याविरोधात चोरीचा माल खरेदी करण्याचा गुन्हा दाखल करू शकते.आरोपी आहेत सराईत गुन्हेगार अटक करण्यात आलेले आरोपी अट्टल गुन्हेगार आहेत. जगदीशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे. कुलदीप ऊर्फ पायजामा, राजेश चोरीच्या प्रकरणात सहभागी आहे. सूत्रधार रमजानच्या विरोधात छेडखानीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी ज्याप्रकारे चार महिने सुपारी चोरून ती विकण्याचे काम केले, यावरून ते सराईत गुन्हेगार असल्याचे सिद्ध होते.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक