मोकळे फिरताहेत आरोपी : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हजगदीश जोशी ल्ल नागपूरउपराजधानीतील गुन्हेगार हप्ता वसुली आणि जमीन हडपण्यासाठी कंपनी चालवित आहेत. अजय राऊत आणि त्याच्या धर्तीवर अपहरण केलेली दुसरी घटना याची साक्ष देत आहे. गुन्हेगारी तत्त्व ज्या पद्धतीने धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिस्थिती एवढी बिघडली आहे की, गुन्हेगार तुरुंगातून सुटल्याबरोबर टोळी तयार करीत आहेत. पोलीसही अनेक दिवसांपासून या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. परंतु त्याचा निपटारा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाहीत.हप्ता वसुलीसाठी व्यापारी, बिल्डर, सट्टेबाजांचे अपहरण करणे ही गुन्हेगारांची जुनीच पद्धत आहे. त्याची सुुरुवात खूप आधी इतवारीमधून झाली. एका वर्षापूर्वी इतवारीच्या एका गारमेंट व्यापाऱ्याचे पाचपावली येथील एका जुगार अड्ड्यावरून अपहरण करून लाखो रुपयांची खंडणी घेतली होती. खंडणी दिल्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली नव्हती. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना पकडले. अजय राऊतचे अपहरण करणारी टोळी अनेक दिवसांपासून नागपुरात सक्रिय आहे. आरोपी मोंटी, सागिर, पिंटु शिर्के हत्याकांडात तसेच अंबाझरी एनआरआय महिलेची जमीन हडपण्याच्या प्रकरणात गुंतलेले आहेत. गुन्हेगारी जगतावर अंकुश ठेऊन आपला वचक निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. त्याच धर्तीवर त्यांनी ‘सॉफ्ट टार्गेट’ निवडण्याचे काम सुरू केले. सूत्रांनुसार चार महिन्यात अनेक गुन्हेगारांनी नागरिकांचे अपहरण करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली. अपहरण केलेल्या अजय राऊत शिवाय इतवारीचा गारमेंट व्यापारी, कामठी मार्ग आणि महालचा सट्टेबाज, बिल्डर यांचा समावेश आहे. गुन्हेगारांना अजय राऊत यांच्या धर्तीवर सर्व जणांची माहिती होती. त्यामुळे ते अपहरण करण्यात यशस्वी झाले. त्यांनी दोन महिन्यात ५ कोटीची वसुली केली. सर्वाधिक खंडणी अजय राऊतपासून घेतली. अजयला दिवसाढवळ्या प्रतापनगरातून उचलून नेले. या घटनेला अनेकांनी पाहिले त्यामुळे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे आरोपींचे कृत्य समोर आले. उपराजधानीत मकोकासारख्या गंभीर प्रकरणातील आरोपी तुरुंगातून सुटत आहेत. ३१ डिसेंबरला हेमंत दियेवार हत्याकांड आणि मकोकाच्या आरोपींची सुटका झाली. दियेवार हत्याकांडातील आरोपींची अनेक दिवसांपासून चर्चा होती. या प्रकरणात इतवारीच्या टोळीने महत्त्वाची भूमिका बजावली. अजय राऊत प्रकरण चर्चेत आल्यानंतर ही टोळी पुन्हा कामाला लागली. हप्ता वसुली विरोधक पथकाचे गठन ४मोंटी हत्याकांड आणि अंबाझरी एनआरआय महिलेची जमीन बळकावणाऱ्या आरोपींनी मनीषनगरात कार्यालय उघडले आहे. येथूनच गुन्हेगारी कारवायांचे संचालन करण्यात येते. नुकत्याच सुमित ठाकूर आणि पिंटु शिर्के हत्याकांडातील दोषींना सोडून सर्व गुन्हेगार शहरात आहेत. त्यांच्यात वर्चस्वावरून नेहमीच भांडण होते. अशा परिस्थितीत पोलिसांसाठी पुढील दिवस डोकेदुखीचे ठरू शकतात. हप्ता वसुली थांबविण्यासाठी गुन्हे शाखेत हप्ता विरोधी पथकाचे गठन करण्यात आले आहे. अजय राऊत प्रकरणात लोकमतने पूर्वीच अनेक लोकांचे अपहरण करून हप्ता वसुली केल्याचा खुलासा केला होता. पोलिसांच्या तपासातही त्याची पुष्टी होत आहे. अशा स्थितीत हप्ता वसुली विरोधी पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती मिळू नये हे आश्चर्यजनक आहे. अजय राऊत प्रकरणात एक गँग आणि मोंटी हत्याकांडातील आरोपी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या आरोपींचे तुरुंगात एका कबाडी व्यावसायिकाशी संबंध होते. कबाडी व्यावसायिकाने तुरुंगात राहून एका जमिनीचा पत्नीच्या नावाने सौदा केला होता. या दिशेने तपास केल्यास कबाडी व्यावसायिकाला तुरुंगाआड जावे लागू शकते.सोशल मीडियाचा प्रभाव ४गुन्हेगार सोशल मीडियाचा चांगलाच फायदा घेत आहेत. व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून ते तरुणांना आकर्षित करीत आहेत. या गुन्हेगारांचे फेसबुक अकाऊंट पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्य वाटेल. हे फेसबुक अकाऊंट अपडेट होत राहते.जमिनीचीही सुपारी४हप्ता वसुलीसोबतच जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी गुन्हेगार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नुकतेच त्यांनी रामनगर चौकातील एक अपार्टमेंट खाली करवून घेतले. एका महिला भाडेकरूला आरोपींनी एकुलत्या एका मुलासोबत अप्रिय घटना घडवून आणण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने घर खाली करून देण्याचा निर्णय घेतला. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.
गुन्हेगार चालविताहेत टोळी
By admin | Published: January 04, 2016 5:09 AM