नागपूर : चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीस गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले.
अनिल भाऊराव टेंभुर्णे (३८) रा. भवानी मंदिर कळमना, बंटी ऊर्फ बग्गा शेरू अहमद खान (२८) न्यू सूरजनगर आणि विनोद ऊर्फ गोपी बाबुराव उमरेडकर (३३) बीडगाव, अशी आरोपींची नावे आहेत.
अनिल आणि बंटी सराईत गुन्हेगार आहेत. अनिल चोरी आणि इतरही गुन्ह्यात तर बग्गा हा एमडी तस्करीतही सामील आहे. काही दिवसापूर्वी नंदनवन पोलीस ठाणे परिसरात जग्वार शोरुम आणि एका कार्यालयात चोरी झाली होती. गुन्हे शाखा पोलिसांना या चोरीत अनिलचा हात असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने चोरीची कबुली दिली. अनिलने चोरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बग्गाला व इतर वस्तू कबाडी विनोद उमेरडकरला विकल्या होत्या. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून ६० हजाराचा माल जप्त केला. गोपीचे बीडगावमध्य कबाडीचे दुकान आहे. तो दिव्यांग आहे. असे सांगितले जाते की, तो चोरीच्याच वस्तू खरेदी करतो.
ही कारवाई अप्पर आयुक्त सुनील फुलारी, डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय कल्याणकर, एपीआय प्रशांत अन्नछत्रे, पीएसआय बलराम झाडोकर, एएसआय शंकर शुक्ला, आनंद काळे, नंदकिशोर शिंदे, विनोद सोनटक्के, मृदुल नागरे, आशिष पवार, सुहास शिंगणे, सूरज भोंगाडे, आशिष पाटिल आणि नरेश देशमातुरे यांनी केली.