शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

नागपुरात देशी पिस्तुलांची तस्करी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:51 AM

देशी पिस्तुलांची (कट्ट्याची) तस्करी करून विक्री करणारी एक टोळी पाचपावली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या पकडली.

ठळक मुद्दे५ आरोपींना अटक ५ पिस्तूल, ७ मॅगझिन, २३ काडतूस जप्तपाचपावली पोलिसांची नाट्यमय कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशी पिस्तुलांची (कट्ट्याची) तस्करी करून विक्री करणारी एक टोळी पाचपावली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या पकडली. या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ५ देशी पिस्तुलांसह ७ मॅगझिन आणि २३ जिवंत काडतूस तसेच मोटरसायकल आणि चाकू जप्त केले. अटकेतील एक आरोपी यवतमाळचा रहिवासी आहे. या टोळीचा सूत्रधार बिहारमधील आहे. तो आणि पाचपावलीतील एक असे दोघे आरोपी फरार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.गेल्या सहा महिन्यांपासून ही टोळी देशी पिस्तूल, मॅगझिन आणि जिवंत काडतुसांची परप्रांतातून तस्करी आणि विक्री करीत असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवणे सुरू केले. बुधवारी सायंकाळी महेंद्रनगर, टेका पाण्याच्या टाकीजवळ पिस्तुलधारी आरोपी जमल्याची माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचला. महिला आणि पुरुष पोलिसांचे पथक वेशांतर करून घटनास्थळी पोहचले. दोन दुचाक्यांवर चार जण पिस्तूल हाताळताना दिसताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून मॅगझिन आणि काडतुसांसह दोन पिस्तूल ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा एका आरोपीच्या घरी छापा घातला. तेथेही पोलिसांना जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल आढळले. मात्र, आरोपी पळून गेले. आरोपी सिकंदर ऊर्फ सोनू शरिफ खान (वय २५, रा. टेका, महेंद्रनगर), सद्दाम अजिज खान (वय २३, रा. नवा नकाशा, लष्करीबाग), मोहिब खान फजल खान (वय २६, रा. नवा नकाशा) आणि सलमान आरिफ अब्दुल जमिल अन्सारी (वय २५, रा. नवा नकाशा) या चौघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. महिनाभरापूर्वी यवतमाळच्या एका तरुणाला दोन पिस्तूल विकल्याची माहिती या आरोपींनी दिली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक यवतमाळच्या अंबिकानगरमध्ये पोहचले. त्यांनी नालंदा चौकात राहणाऱ्या सन्नी ऊर्फ प्रज्वल अत्तरसिंग चव्हाण (वय २५) याला तब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले.अशाप्रकारे या पाच आरोपींकडून पोलिसांनी ५ पिस्तूल, ७ मॅगझिन आणि २३ काडतुसे आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या. या घातक शस्त्रांची आणि जप्त केलेल्या साहित्याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मंजूर केला.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे, ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक आर. एल. दुबे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, विनोद धोंगडे, हवलदार विजय यादव, राजेश देशमुख, प्रदीप पवार, विनोद गायकवाड, विनोद बरडे, महेश जाधव, स्वाती मोहाडे यांनी ही कामगिरी बजावली.सूत्रधाराच्या अटकेनंतर बरेच खुलासेया टोळीचा सूत्रधार बिहारमधील रहिवासी असून, तो नेहमी नागपूर - महाराष्टत पिस्तुलांच्या खेप आणतो. त्याला तसेच येथील एका फरार आरोपीला अटक केल्यानंतर पुन्हा या तस्करीच्या नेटवर्कचा खुलासा होऊ शकतो, असे उपायुक्त माकणीकर यांनी सांगितले. नागपूर - विदर्भात नेमके किती आणि कुणा-कुणाला पिस्तूल तसेच काडतुसे विकल्या गेली, त्याचीही माहिती मिळू शकते. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे, पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे उपस्थित होते.पिस्तूल देशी की विदेशी ?जप्त केलेल्या पिस्तुलांवर मेड इन चायना असे लिहून आहे. त्यांची बनावटही विदेशी पिस्तुलांसारखीच दिसते. मात्र, त्या देशीच असाव्यात, असा अंदाज उपायुक्त माकणीकर यांनी व्यक्त केला. खात्री करून घेण्यासाठी या पिस्तुलांना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून या गोरखधंद्यात सहभागी आहेत. ते ग्राहक पाहून कुणाला ३० तर कुणाला ३५ हजारात पिस्तूल विकत होते. सन्नी चव्हाण वगळता सर्व आरोपी नागपुरातील आहेत. त्यांचा क्राईम रेकॉर्ड तपासला जात आहे. यवतमाळचा सन्नी मासेमारीचे कंत्राट घेतो. निक्की नामक मित्राच्या माध्यमातून तो या आरोपींच्या संपर्कात आल्याचे पोलीस सांगतात. सलमानची पानटपरी आहे. अन्य तिघांवर छोटेमोठे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस