लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारीच नव्हे कैद्यांनाही कोरोनाने विळखा घातला. तब्बल २१९ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्याच अनेक खतरनाक गुंडांचाही समावेश आहे. नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा प्रमुख समजला जाणारा गँगस्टर संतोष आंबेकर यालाही कोरोनाची बाधा झाली. त्याच्यानंतर राजा गौसला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आठ दिवसांपूर्वी लक्षात आले. गौसला लक्षणे तीव्र स्वरूपाची असल्यामुळे मेयोत त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याच दिवशी त्याला कारागृहात आणण्यात आले. या दोघांवरही कारागृहातील इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांनी दिली.
नागपुरातील गँगस्टर आंबेकर आणि गौसला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:53 PM
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ठळक मुद्देकारागृहातील इस्पितळात उपचार : प्रकृती ठीक असल्याचा दावा