लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या टोळीवर पोलिसांनी मकोकानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसोबतच आंबेकरच्या आर्थिक आणि गुन्हेगारी जगतात पसरलेले साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची सुरुवात झाली आहे.मकोकात आंबेकरसोबत त्याचा भाचा नीलेश केदार, खजांची राजेंद्र ऊर्फ राजा अरमरकर, खरे टाऊन धरमपेठ, चंदन ओम्रकाश चौधरी, जुही चौधरी, मुंबई, अंकितकुमार महेंद्रभाई पटेल, अंकलेश्वर, गुजरात, अजय लक्ष्मण पटेल, महाड मुंबई तसेच अरविंद द्वारकाभाई पटेल, सुरत यांना आरोपी करण्यात आले आहे. राजा अरमरकरला सोडून इतर सात आरोपींना आज न्यायालयात हजर करून १० दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. तपासाच्या आधारे काही दिवसात डझनभरापेक्षा अधिक जणांना आरोपी केल्या जाऊ शकते. आंबेकर टोळीविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. चार प्रकरणात आंबेकरला आरोपी करण्यात आले आहे. यात सीताबर्डीत दाखल पाच कोटींची फसवणूक, सोनेगावमध्ये एक कोटींची फसवणूक, लकडगंजमध्ये बलात्कार तसेच तहसीलमध्ये अवैध सावकारीच्या प्रकरणाचा समावेश आहे. एक गुन्हा खापा पोलिसांनी त्याचा भाचा नीलेश केदार तसेच इतरांविरुद्ध दाखल केला आहे. सोनेगावच्या प्रकरणात त्याचा भाचा सन्नी विकास वर्मा आरोपी आहे. पोलिसांनी सध्या सनीला आरोपी बनविले नाही. १२ आॅक्टोबरला पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आंबेकर पोलिसांच्या ताब्यात आहे. आंबेकर दोन दशकांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. त्याच्याजवळ सहकाऱ्यांची टोळी आाहे. नेत्यांच्या आश्रयामुळे त्याचे साम्राज्य वाढत गेले. खून, हप्ता वसुली, जमिनीचा ताबा घेण्यात तो पटाईत होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चारवेळा मकोकाची कारवाई केली आहे. परंतु शिक्षा न झाल्याने तो निर्ढावला होता. तो पोलिसांकडे तक्रार करण्याचे टाळणाऱ्या विशेष समूहाच्या नागरिकांना टार्गेट करीत होता. काही काळापासून तो सुपारी व्यवसायाशी जुळला होता. नागपूर सुपारी व्यवसायात देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. प्रत्येक महिन्याला कोट्यवधींचा व्यवहार होतो. हा व्यवहार हवालाच्या माध्यमातून होता. सूत्रानुसार, आंबेकर सुपारीच्या तस्करीशी निगडित दोन ट्रान्सपोर्टर्सच्या माध्यमातून सुपारी व्यवसायाकडे वळला होता. त्याच्या दोन्ही साथीदारांनी ट्रान्सपोर्टर्सची भेट घेतली होती. दोघांचेही शहराच्या सुपारी व्यवसायावर राज्य आहे. ते आंबेकरसारखे व्यापाऱ्यांना तपासाची धमकी देऊन वसुली करतात. त्यांच्या आर्थिक प्रगतीत आंबेकरची महत्त्वाची भूमिका आहे. तपासात खरी माहिती समोर येऊ शकते.२५ कोटींच्या संपत्तीचा सुगावासूत्रांनुसार, आतापर्यंत तपासात पोलिसांना आंबेकरशी निगडित २५ कोटींच्या संपत्तीचा सुगावा लागला आहे. ही संपत्ती त्याने राजा अरमरकरसारख्या साथीदारांच्या मदतीने जमविली होती. ते आंबेकरच्या इशाऱ्यावर सर्व प्रकारची कामे करीत होते. आंबेकरच्या संपत्तीशी निगडित पाच-सहा जणांच्या नावाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरू आहे. मकोकाची कारवाई सीताबर्डी प्रकरणात करण्यात आली आहे. इतर प्रकरणातही मकोका लावल्या जाऊ शकतो.दागिन्यांसह तीन कोटी जप्तगुन्हे शाखेने आंबेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून आतापर्यंत १.४५ कोटी रुपये रोख आणि दीड कोटींचे दागिने जप्त केले आहेत. दीड कोटीचे दागिने राजा अरमरकरच्या लॉकरमधून जप्त केले आहेत. राजाचे शहरात अनेक ठिकाणी लॉकर आहेत. तो नागरिकांचे दागिने गहाण ठेवून कर्ज देतो. आंबेकरच्या पैशानेच त्याने नागरिकांना कर्ज दिल्याचा संशय आहे. आतापर्यंत रोख ८४ लाख अरमरकरकडून मिळाले आहेत.
नागपूरचा गँगस्टर आंबेकरच्या टोळीवर लावला मकोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:41 PM
कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या टोळीवर पोलिसांनी मकोकानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसोबतच आंबेकरच्या आर्थिक आणि गुन्हेगारी जगतात पसरलेले साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्देआर्थिक साम्राज्य होणार उद्ध्वस्त : सुपारी व्यवसायातही हप्ता वसुली