पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 24, 2023 01:53 PM2023-03-24T13:53:59+5:302023-03-24T13:54:14+5:30

नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून पकडले

Ganja smuggler from Pune sentenced to three years rigorous imprisonment | पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास

पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास

googlenewsNext

नागपूर : सत्र न्यायालयानेपुणे जिल्ह्यातील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्या. पी. वाय. लाडेकर यांनी हा निर्णय दिला.

धनेश पुरी गुरू प्रेम पुरी (५९) असे आरोपीचे नाव असून तो लोणावळा येथील रहिवासी आहे. २ फेब्रुवारी २०१७ रोजी विशाखापट्टम-निजामुद्दीन समता एक्सप्रेसमधून गांचाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती नागपूरच्या रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यावरून मुख्य रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला.

समता एक्सप्रेस नागपूरमध्ये थांबताच पुरीकडील सामानाची झडती घेण्यात आली. दरम्यान, एका थैलीमध्ये १ लाख ४६ हजार ७६० रुपये किमतीचा १४.६७६ किलो गांजा मिळून आला. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुरीला अटक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. दीपाली गणगणे यांनी कामकाज पाहिले

Web Title: Ganja smuggler from Pune sentenced to three years rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.