शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

By मोरेश्वर मानापुरे | Published: February 18, 2024 11:31 PM

कळमन्यात दररोज १२० टन आवक : घाऊक २०० रुपये तर किरकोळमध्ये ४०० रुपये किलो, दरवाढीवर नियंत्रण आणावे

नागपूर : भाजीच्या चवीसाठी असलेली लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. घाऊकमध्ये भाव २०० रुपयांपर्यंत उतरल्यानंतरही किरकोळ विक्रेते ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कळमन्यात चार दिवसांपासून पुरवठा वाढल्याने उत्तम दर्जाच्या लसणाची २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या दररोज १२० टन लसणाचा पुरवठा होतो, हे विशेष.चार महिन्यांपासून आवक कमीदरवाढीमुळे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाची जागा डिसेंबरपासून कमी झाल्याचे दिसत आहे. गावराण लसूण चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना, अशी स्थिती आहे. नागपुरातील बहुतांश किरकोळ बाजारात डिसेंबरपासून लसणाच्या किमती चारपटीने वाढल्या. त्यामुळे किरकोळमध्ये दराने किलोमागे ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. कळमना आलू, कांदे आणि लसूण अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने भाव दिवसेंदिवस वाढले. मात्र, कळमन्यात चार दिवसांपासून नवीन लसणाचा पुरवठा वाढला आहे. दररोज मध्यप्रदेश (छिंदवाडा) येथून सहा ट्रकची (प्रति ट्रक २० टन) आवक होत आहे. जुना लसूण डिसेंबर महिन्यातच संपला आणि तेव्हा नवीन मालाची आवक फारच कमी होती. थंडीच्या दिवसात मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने लसणाचे भाव गगनाला भिडले. भाव हळूहळू भाव कमी होऊन सामान्यांच्या आटोक्यात येतील.लसणाची चटणी गायब !लसणाच्या दरवाढीमुळे अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात आले. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहतील. पण आता आवक वाढताच भाव कमी झाले. त्यानंतरही किरकोळमध्ये ग्राहकाला ४०० ते ४५० रुपये किलो दरानेच लसूण खरेदी करावे लागत आहे. ऐन दिवाळीतही लसूण महागल्याने सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागली होती.लसणाचे दर का वाढले?प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडला. खराब हवामानामुळे मुख्यत्त्वे लसणाचे पीक खराब झाले आणि दर वाढले. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांनीदेखील पाठ फिरवली. रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.लसणासोबत अद्रकही महागगौरव हरडे म्हणाले, खराब हवामानाचा फटका लसणासोबत अद्रक पिकालाही बसला. कळमना घाऊक बाजारात १०० रुपये किलोवर पोहोचलेले अद्रकाचे दर ८० ते ९० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, किरकोळमध्ये २०० रुपये किलो दर आहेत. अद्रक असो वा लसूण किरकोळ विक्रेते रोखीने माल खरेदी करून तब्बल १५ ते २० दिवस साठवणूक करतात. त्यातील काही टक्के माल खराब होतो. त्याची भरपाई म्हणून त्यांना माल जास्त दरात विकावा लागतो.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी