नागपूर : नागपुरातील गारवा २४ तासानंतरही कायम आहे. शहरातील थंडीच्या पाऱ्यामध्ये दिवसभरात थोडी घट झाली असली तरी सायंकाळनंतर मात्र पुन्हा जाणवायला लागली. नागपुरातील किमान तापमानाचा पारा मंगळवारी १०.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला.
नेहमीप्रमाणे गोंदियातील तापमानाचा पारा मंगळवारीही विदर्भातून खालावलेला होता. तिथे ९.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. गडचिरोली, यवतमाळात १० अंश सेल्सिअस तर वाशिम आणि अमरावतीमध्ये १०.४ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. अकोल्यामध्ये १०.५ अंशाची नोंद झाली. वर्धामध्ये ११ अंश तर चंद्रपूर आणि बुलडाणामध्ये ११.४ व ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
नागपुरात सोमवारी रात्री बोचरी थंडी होती. मंगळवारी दिवसभर स्वच्छ ऊन असले तरी वातावरणात गारवा कायम होता. सायंकाळनंतर थंडी अधिक जाणवत होती. शहरातील दृश्यता २ ते ४ किलोमीटर नोंदविण्यात आली. आर्द्रता सकाळी ४९ टक्के होती, तर सायंकाळी त्यात घट होऊन २८ टक्के झाली.