श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : एकेकाळी जिल्ह्यातील समृद्ध नगर परिषद म्हणून गाजावाजा असलेले मोवाड हे वर्धा नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाले. ३० जुलै १९९१ ची ती ‘काळ रात्र’ ठरली आणि २०४ ग्रामस्थांना जलसमाधी मिळाली. त्या दुर्घटनेमुळे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले मोवाड आता २६ वर्षांनंतर कात टाकू लागले आहे. तेथील जीवनमान पूर्वपदावर येत असून विकासकामांना आता चालना मिळू लागली आहे. यामुळे आता मोवाडची गतवैभवाकडे वाटचाल सुरू झाली आहे.महापुरानंतर मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. ६.६५ चौरस किमी क्षेत्रात वसलेल्या पुनर्वसित मोवाड गावाची लोकसंख्या सध्याच्या घडीला ८७७७ आहे. गावात २२ किमी लांबीचे रस्ते आहे. एक महाविद्यालय, दोन हायस्कूल, चार प्राथमिक शाळा आहे. शासकीय रुग्णालय, बँका यासह इतर कार्यालये नागरिकांच्या सेवेत आहे. गावात ५ कोटी ३६ लाख रुपये खर्चातून रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. शहराप्रमाणे रस्त्यांना सोलर पॅटर्न स्टड लावल्यामुळे गावाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. २ कोटी ४० लाख रुपये खर्चातून १०५ दुकान गाळ्याची कामे सुरू आहेत. याचा फायदा येथील बेरोजगार तरुणांना होणार आहे. २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बाजारात ओट्यांची निर्मिती केली जात आहे.वैशिष्ट्यपूर्ण कामे आणि दलित वस्तीअंतर्गत गावातील सहा उद्यानांमध्ये प्ले स्टेशन, ग्रीन जिम, खेळणी, योग केंद्र आदींची सुविधा करण्यात येत आहे. चार कोटींच्या निधीतून मिनी स्टेडियम तसेच वॉर्ड क्र. ३ मध्ये जिम, बॅडमिंटन कोर्ट, वेटलिफ्टिंग, कबड्डी मैदान, हॅन्डबॉल कोट, रनिंग ट्रॅक येथे साकार होणार आहे. गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ४४ किमी लांबीच्या नाल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई येथील आयआयटीकडून शहर स्वच्छता आराखड्यांतर्गत सांडपाणी तंत्रज्ञान घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.कर्जमाफ, हस्तांतरणाची अट रद्दमहापुरानंतर नवीन ठिकाणी पुनर्वसन करताना शासनाने मोवाड येथील नागरिकांना कर्जपुरवठा केला. तसेच अहस्तांतरणीय जमिनीचे पट्टे वाटप केले. परंतु पुनर्वसनस्थळी रोजगाराच्या फारशा संधी नसल्याने नागरिकांना कर्जाची परतफेड करण्यात प्रचंड अडचणी गेल्या. मोवाडचे नागरिक महापुराच्या धक्क्यातून सावरत असताना कर्जामुळे पुन्हा ते अस्वस्थ झाले. यासाठी तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर अख्ख्या मोवाडवरील कर्ज माफ झाले.
गतवैभवाकडे मोवाडची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:55 AM
एकेकाळी जिल्ह्यातील समृद्ध नगर परिषद म्हणून गाजावाजा असलेले मोवाड हे वर्धा नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाले.
ठळक मुद्देमोवाड महापुराला २६ वर्षे : २०४ गावकºयांना मिळाली होती जलसमाधी