लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ५१ गावात एकूण १५१ एकदिवसीय नृत्यमय गीतरामायण कार्यक्रम सादर होणार आहेत. यात विदर्भातील सुमारे १००० गायक, वादक, नर्तक कलावंतांचा सहभाग राहणार आहे. संस्कार भारतीतर्फे मागील १५ वर्षांपासून नववर्ष अभिवादनाप्रसंगी गीतरामायण प्रस्तुतीचा उपक्रम राबविण्यात येतो.विदर्भातील ११ जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमध्ये गीतरामायण कार्यक्रम केले जाणार असून त्यासाठी संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष सूरमणी डॉ. कमल भोंडे, कार्याध्यक्ष सुधाकरराव अंबुसकर, उपाध्यक्ष श्याम देशपांडे, प्रांत संयोजक गजानन रानडे, अमर कुलकर्णी, सहसंयोजक डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, डॉ. जयश्री वैष्णव यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत नागपूर शहरातील ५१ ठिकाणी नृत्य, नाट्यमय गीतरामायण प्रस्तुतीचे आयोजन करण्यात येणार आहे. नवोदित गायक व वादकांसाठी ३ मार्च रोजी नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांचे वय ५० वर्षांच्या आत आहे अशा इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्कार भारतीच्या नागपूर शहर अध्यक्ष कांचन गडकरी, शहर मंत्री मनोज श्रोती यांनी केले आहे.
विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:00 AM
यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ५१ गावात एकूण १५१ एकदिवसीय नृत्यमय गीतरामायण कार्यक्रम सादर होणार आहेत.
ठळक मुद्देसंस्कार भारतीचे आयोजन : ‘गदिमा’ व सुधीर फडके यांना अनोखी स्वरांजली देणार