लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आलेले अडथळे हटविण्यासाठी पॉकेट ट्रॅक उपयोगी ठरेल, असा महामेट्रोचा दावा आहे.पॉकेट ट्रॅक म्हणजे काय?प्रत्येक मेट्रो प्रकल्पात अप आणि डाऊन असे दोन रेल्वे मार्ग असतात. पण याशिवाय सुमारे १०० मीटर लांबीच्या ट्रॅकचे बांधकाम ठराविक ठिकाणी करण्यात येते. त्याचा उपयोग बंद पडलेली गाडी उभी करण्याकरिता होत असल्याने या ठराविक ट्रॅकला पॉकेट ट्रॅक असे म्हणतात. सर्वसामान्यपणे मेट्रो रेल्वेकरिता टाकण्यात येणाºया रुळांचे बांधकाम सेगमेंटल गर्डरच्या माध्यमाने होते. मात्र पॉकेट ट्रॅकच्या बांधकामात आय-गर्डरचा उपयोग होतो. अप किंवा डाऊन मार्गावर बंद पडलेली मेट्रो रेल्वे बॅटरीद्वारे संचालित होणाºया पॉवर इंजिनच्या मदतीने ओढत पॉकेट ट्रॅकपर्यंत पोहोचविली जाते. मेट्रो मार्गावर वाहतूक कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तांत्रिक बिघाड झालेली गाडी दुरुस्तीसाठी डेपोला नेली जाते.रिच-१ मध्ये रहाटे कॉलनीजवळ पॉकेट ट्रॅकनागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या चारही मार्गिकांवर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो स्टेशन दरम्यान असेलल्या रिच-१ भागातील रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनजवळ पॉकेट ट्रॅकचे बांधकाम निर्माणाधीन आहे. तसेच लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनदरम्यान असेलल्या रिच-३ भागातील रचना मेट्रो स्टेशन येथे पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करण्यात येत आहे. याशिवाय रिच-२ आणि रिच-४ या भागांमध्येदेखील येत्या काळात पॉकेट ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.
महामेट्रो करणार पॉकेट ट्रॅकचे निर्माण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:05 AM
तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आलेले अडथळे हटविण्यासाठी पॉकेट ट्रॅक उपयोगी ठरेल, असा महामेट्रोचा दावा आहे.
ठळक मुद्दे मेट्रो मार्गावर खोळंबा टाळण्यास मदत : सर्व रिचमध्ये उभारणी