शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 8:47 PM

प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेलमुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिका मुख्यालयासमोरील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात सीएनजी बससेवेचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देसीएनजी बससेवेचा शुभारंभनागपूर प्रदूषणमुक्त हरित शहर बनेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेलमुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिका मुख्यालयासमोरील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात सीएनजी बससेवेचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, माजी महापौर प्रवीण दटके, उपसभापती प्रवीण भिसीकर, स्थायी समितीचे भावी अध्यक्ष प्रदीप पोहाणे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तुºहाटी, तणस, उसाची मळी यापासून बायो-सीएनजीची निर्मिती होते. पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्याप्रमाणात होते. धानाच्या तणसापासूनही सीएनजी निर्माण करून यावर वाहने धावतील,असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.केंद्रीय परिवहन मंत्रालयातर्फे मुंबई, नवी मुंबई, गुवाहाटी या शहरात मिथेनॉलवर चालणाऱ्या बसेसचा एक पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. गंगा ब्रम्हपुत्रामध्ये इॅथेनॉलवर संचालित इंजिनाच्या साहाय्याने जल वाहतूक होत आहे. यामुळे वाहतूक खर्चात घट झाली आहे. नागपूर शहरातही शंभर टक्के इॅथेनॉलवर चालणाऱ्या स्कॅनिया बस प्रकल्पाची चर्चा देशभरात होत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.मनपाची ७० कोटींची बचतपेट्रोल, डिझेलवर चालणारी नागपूर शहरातील वाहने सीएनजीद्वारे संचालित झाल्याने नागपूर शहर जल-वायू प्रदूषणापासून मुक्त असे हरित शहर होईल. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या १५० बसेस तसेच महापालिकेची १५० वाहने सीएनजीवर धवातील. यातून ७० कोटींची बचत शक्य असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत केल्यास महामंडळाचा तोटा कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.बसचे आयुष्य वाढणारडिझेलवरील बसचे आयुष्य आठ वर्षेअसते. मात्र सी.एन.जी.मध्ये परिवर्तीत करण्यात येणाऱ्या बसमध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ए.आर.ए.आय.) तर्फे प्रमाणित व पोलंडद्वारे निर्मित सी.एन.जी. किटस लागणार आहे. अशा ग्रीन बसचे आयुष्य १५वर्षे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० बसेस सी.एन.जी.वर चालतील. यासोबतच महापालितील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बसेस सी.एन.जी.वर चालविण्यात याव्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.जलसंधारण विभागाचे मुख्यालय नागपुरात- पालकमंत्रीजलसंधारण विभागाचे विदर्भाचे कार्यालय औरंगाबाद येथे होते. ते आता लवकरच नागपुरात सुरू होणार आहे. सोबतच मुख्य अभियंयाचे कार्यालय राहणार आहे. शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी दिली.शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवासमहापालिकेच्या बसमध्ये शहीद जवानांचे कुटुंबीय व दिव्यांग व्यक्तींना संपूर्ण प्रवास मोफत दिला जाणार आहे. सी.एन.जी.चा डेपो खापरी येथे उभारला जाणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती कुकडे यांनी यावेळी दिली. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDieselडिझेल