लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. याशिवाय दुकानातील उपलब्ध वस्तूंच्या साठ्यांच्या नोंदणी व पुरवठ्यासाठी दुकानदार किंवा सेवा पुरवठादार यांच्याकरिता ‘बास्केट ओनर’ हेसुद्धा अॅप तयार करण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही विशेष खबरदारी घेत घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी मनपातर्फे आवश्यक सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दुकानदार आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने दोन विशेष अॅप तयार करण्यात आले आहेत. ग्राहकांसाठीच्या फार्म टू होम या अॅपद्वारे दुकानामध्ये उपलब्ध वस्तूंचा साठा आणि त्याच्या किमती लक्षात घेऊन ग्राहकांना आपली मागणी नोंदविता येईल. त्यानुसार आवश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येईल. बास्केट ओनर हे अॅप दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांकरिता तयार करण्यात आले आहे. यासाठी आधी दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांना आवश्यक माहिती सादर करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर दुकानामध्ये उपलब्ध वस्तू अथवा मालाची माहिती, साठा, त्याची किंमत याचा तपशील सादर करावा लागेल. सद्यस्थितीत मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हे दोन्ही अॅप डाऊनलोड करता येऊ शकतात. ज्यांना अॅप डाऊनलोड करणे शक्य नाही त्यांनी ०७१२-२५२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क साधणाऱ्या ग्राहक आणि दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंसंदर्भात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ग्लोबल लॉजिक कंपनीद्वारे दोन्ही अॅप तयार करण्यात आले असून त्याला ऋत्विक जोशी यांच्या नीती या कंपनीचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. याशिवाय जे दुकानदार स्वत:च्या मनुष्यबळाद्वारे घरपोच सेवा देण्यास इच्छुक आहेत त्यांनीही अॅपवर नोंदणी करावी किंवा संपर्क क्रमांकावरून माहिती कळवावी, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तू अॅपवरून मागवा घरपोच! मनपा आयुक्तांची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:58 PM
लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अॅप तयार करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे ‘फार्म टू होम’ विशेष अॅप