अशोक चव्हाण : कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम नागपूर : माजी नौदल अधिकारी व महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक केली. कोणताही पुरवा नसताना त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंच छाती असेल तर त्यांनी शिष्टमंडळासह पाकिस्तानात जाऊन जाधव यांची सुटका करावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिले. जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस प्रयत्न करावे म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. व्हेरायटी चौकात आयोजित कार्यक्रमात चव्हाण यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिक्षा सुनावताना कोणालाही बाजू मांडण्याची संधी दिली जाते. परंतु जाधव यांना अशी संधी न देता पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.. भारताला कमी लेखण्यासाठी पाकिस्तानने हे कृ त्य केले आहे. पंतप्रधान लग्नसमारंभासाठी पाकिस्तानात जातात. मग शिष्टमंडळासह पाकिस्तानात जाऊन त्यांनी जाधव यांना भारतात परत आणावे, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असल्याचे अशोक चव्हाण यांनी सागितले. कायदा पायदळी तुडवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक आहे. त्यांना भारतात परत आणण्यासाटी प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. उपस्थितांनी स्वाक्षऱ्या करून पाकिस्तानचा निषेध केला. शहर काँग्रेसचे मुख्य महामंत्री डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन केले. यावेळी माजी आ. यादवराव देवगडे, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, महापालिके तील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जयंत लुटे, संदेश सिंगलकर, प्रा.दिनेश बानाबाकोडे , अॅड. अक्षय समर्थ, प्रशांत धवड, देवा उसरे, मनोज सांगोळे, प्रा. अनिल शर्मा, दीपक वानखेडे,अनिल पांडे, मालिनी खोब्रागडे,चंद्रक ांत हिंगे, पंकज निघोट, नेहा विवेक निकोसे, नितीन ग्लावबंशी, रेखा बाराहाते, भावना लोणारे, उज्ज्वला बनकर, नितीन आठवले, परसराम मानवटकर, दिनेश यादव, प्रकाश बांते, अनिता ठाकरे, रमण पैगवार, इरफान कमर, अब्दुल शकील, शत्रुघ्न लोणारे, कृष्णा गोटाफोडे, विलास भालेकर, प्रसन्ना बोरकर, संजय सरायकर, राकेश पन्नासे, जगदीश तिरलवार यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
५६ इंच छाती असेल तर जाधव यांची सुटका करा
By admin | Published: April 13, 2017 2:59 AM