आॅनलाईन लोकमतचंद्रपूर- उन्हाळ््याचा तडाखा सहन न होऊन पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या एका हरणाला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्याच्या परिसरात घडली. या भागात तापमान ४६ अंशावर गेले असून, पाणवठे कोरडे झाले आहेत. पाण्याच्या शोधात हे हरिण गावाजवळ आले मात्र तेथेही त्याला पाणी न मिळाल्याने त्याचा करुण मृत्यू झाला. जंगलातील पाणीसाठी संपल्याने वन्य पशू गावांकडे वळले आहेत. झाडांवरच्या चिमण्याही गायब झाल्याने आता सकाळी त्यांचा चिवचिवाट ऐकू येत नाही.
पाण्याअभावी हरणाचा मृत्यू
By admin | Published: May 23, 2017 1:11 PM