लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनकाळात राज्यातील विकास योजना थांबविल्या जात आहेत. या सरकारची गती थांबली असून मती भ्रष्ट झाली आहे. आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.हे सरकार सुरू होण्याच्या अगोदरच गडगडण्याच्या स्थितीत आले आहे. सरकार आले तेव्हाच हे किती दिवस चालेल याची चर्चा जनतेमध्ये होती. ज्या पद्धतीने सरकारचे काम सुरू आहे त्यावरुन हेच दिसून येत आहे. आम्ही विकासाच्या कामाला गती देऊ, विचारपूर्वक काम करु, सरकारचे काम द्वेषपूर्ण राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र यांनी ज्या पद्धतीने विकासाच्या योजनांना थांबविण्याचे काम केले आहे त्यावरुन एकप्रकारे ते महाराष्ट्राच्या विकासाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आम्हाला आॅपरेशन कमळ राबविण्याची आवश्यकता नाही. कर्नाटकचे राजकारण सर्वांनी पाहिले. लोकशाही पद्धतीने तेथे निर्णय आला. आता ईव्हीएमबाबत कुणीही बोलत नाही. जनतेने तेथे भाजपाला कौल दिला आहे, असे ते म्हणाले.महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणूमहाविकास आघाडीने सत्ता सोडली तर निश्चित निवडणुकांना सामोरे जाऊ व एकट्याच्या ताकदीने सरकार स्थापन करून दाखवू. निवडणुकीची स्थिती आली तर आमची नेहमीच तयारी आहे, असा विश्वासदेखील गिरीश व्यास यांनी व्यक्त केला.
सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल : गिरीश व्यास यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 21:20 IST
आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल : गिरीश व्यास यांचा दावा
ठळक मुद्देसरकारची गती थांबली, मती भ्रष्ट झाली