बुलेट चालकाने केली शिपायाला मारहाण
नागपूर : वाहनाच्या सायलेंसरबाबत कारवाई केल्याने एका बुलेट चालकाने वाहतूक शाखेच्या पाेलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. गुरुवारी दुपारी सीए राेडवर ही घटना घडली. आराेपीचे नाव कृष्णकुंज अपार्टमेंट निवासी विक्रांत हरीश वासानी (२२) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत दुपारी १२.४५ वाजताच्या दरम्यान त्याची एमएच-०४, केएम-२१४२ क्रमांकाची बुलेट घेऊन गीतांजली टाॅकीज चाैक ते अग्रसेन चाैकाकडे जात हाेता. यादरम्यान चालान कारवाई करीत असलेले प्रकाशचंद्र मिश्रा यांना विक्रांतने बुलेटचे सायलेंसरमध्ये बदल केल्याची बाब लक्षात आली. त्यांनी विक्रांतला थांबवून चालान कारवाई सुरू केली. यामुळे संतापलेल्या विक्रांतने वाद घातला. शिवीगाळही केली आणि मारहाणही केली. मिश्रा यांनी सूचना देताच काेतवाली पाेलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विक्रांतला पाेलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेथे आल्यानंतरही ताे रुबाब दाखवत हाेता. त्यामुळे त्याला अटक करुन त्याच्या विराेधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व कामकाजास बाधा पाेहचविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.