शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

धक्कादायक! नागपुरात तरुणीचे भरदिवसा अपहरण करुन सामुहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 6:01 PM

उपराजधानीत १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे अपहरण तिच्याच एका मित्राकडून करण्यात आल्याचे कळते.

नागपूर - उपराजधानीच्या मध्य भागातून एका तरुणीचे (वय १९) अपहरण करून तिला कळमन्यात नेल्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला निर्जन भागात सोडून आरोपी पळून गेले. पीडित तरुणी दुपारी १२ च्या सुमारास कळमना ठाण्यात पोहचल्यानंतर ही घटना उजेडात आली. त्यानंतर शहरात एकच खळबळ निर्माण झाली.

पीडित तरुणी फेटरी मार्गावरील रहिवासी आहे. ती बीए प्रथम वर्गाची विद्यार्थिनी आहे. संगीताचे धडे घेण्यासाठी रोज रामदास पेठेतील एका इमारतीत जात होती. नेहमीप्रमाणे सोमवारी ती बसने सीताबर्डीत उतरली. तेथून ती पायी चालत रामदास पेठेत आली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ती दगडी पार्कजवळून जात असताना तिच्याजवळ एक कार (व्हॅन) थांबली. बुटीबोरीकडे कुठून जावे लागते, असे विचारून तिला एकाने जवळ बोलविले आणि दुसऱ्या एका तरुणाने तिला कारमध्ये कोंबले. आरोपींनी तिला कारमध्ये मारहाण करून तोंडावर कापड बांधल्यानंतर कळमन्यात नेले. चिखली ते डिप्टी सिग्नल भागात निर्जन परिसरात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. आरोपी पळून गेल्यानंतर पीडित तरुणी तेथून पायी चालत एका टाईल्सच्या दुकानात पोहचली. दुकानदाराला तिने हा कोणता एरिया आहे, असे विचारले. त्यानंतर तेथून फोन करून तिने आपल्या आईला आणि एका मित्राला माहिती देत बोलवून घेतले. त्यानंतर मित्रासह ती कळमना ठाण्यात पोहचली. तरुणीने सामूहिक बलात्काराची माहिती देताच पोलीस दल हादरले. तिची विचारपूस करतानाच ठाणेदार विनोद पाटील यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली.

घटनास्थळाची शोधाशोध

माहिती कळताच उपायुक्त मनीष कलवानिया कळमन्यात पोहचले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सीताबर्डी ठाण्यात पोहचले. तिकडे कळमन्यात विचारपूस केल्यानंतर तरुणीची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. दरम्यान, रात्रीपर्यंत कळमन्यातील नेमके घटनास्थळ आणि आरोपी स्पष्ट झाले नव्हते.

दगडी पार्कजवळ अनेकांना विचारपूस

पीडित तरूणी गोंधळल्यासारखी झाल्याने नीट माहिती देत नव्हती. घटनास्थळाची सुरूवात सीताबर्डीच्या दगडी पार्कमधून झाल्याने ठाणेदार अतुल सबनीस आणि सहकाऱ्यांनी मुनलाईटपासून पंचशील चाैक ते दगडी पार्क परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. दगडी पार्कजवळ अनेकांना विचारपूस केली.

आरोपींच्या लवकरच मुसक्या बांधू - पोलीस आयुक्त 

या खळबळजनक घटनेमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तपासात अडथळा निर्माण होण्याची सबब पुढे करून कुणीही अधिकृत माहिती देत नव्हते. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आरोपींना हुडकून काढण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी कळमना, सीताबर्डी तसेच गुन्हे शाखेची अनेक पथके आरोपीच्या शोधासाठी कामी लावण्यात आल्याचे सांगितले. लवकरच गुन्ह्याचा उलगडा करून आम्ही आरोपींच्या मुसक्या बांधू, असेही पोलीस आयुक्त लोकमतशी बोलताना म्हणाले.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणKidnappingअपहरण