प्रिया मस्के (वय ३६) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव प्रणय गजभिये (वय ३२, रा. एनआयटी गार्डनजवळ) असून, तो महापालिकेत कर्मचारी असल्याचे पोलीस सांगतात.
कामगारनगरात राहणाऱ्या प्रिया मस्केसोबत आरोपी प्रणयची सात वर्षांपासून मैत्री आहे. त्यामुळे प्रियाची आई ‘महत्त्वाची बोलणी करण्यासाठी’ काही दिवसापूर्वी आरोपीच्या घरी गेली होती. त्यामुळे आरोपी संतप्त झाला. शनिवारी सायंकाळी त्याने प्रियाचे घर गाठले. तुझी आई माझ्या घरी आलीच कशी, असा प्रश्न करून त्याने प्रियाशी वाद घातला आणि तिला बेदम मारहाण केली. आजूबाजूच्यांनी धाव घेऊन आरोपीला आवरले, नंतर प्रियाने कपिलनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. उपनिरीक्षक आर. वाय. श्रीखंडे यांनी आरोपी प्रणय गजभियेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
---