शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

जुळ्या भावंडांनी वाचविला मुलीचा जीव

By admin | Published: November 27, 2014 12:22 AM

संकटसमयी मदत न करता, पाठ दाखवून पुढे निघून जाणारी वृत्ती वाढली आहे. अपघातात बघ्याची भूमिका घेऊन गर्दी वाढविणारे खूप आहेत. माणुसकीची भावना हरविलेल्या लोकांच्या डोळ्यात

१० वर्षीय बालकांचा पराक्रम : कौतुकाची थापनागपूर : संकटसमयी मदत न करता, पाठ दाखवून पुढे निघून जाणारी वृत्ती वाढली आहे. अपघातात बघ्याची भूमिका घेऊन गर्दी वाढविणारे खूप आहेत. माणुसकीची भावना हरविलेल्या लोकांच्या डोळ्यात १० वर्षीय जुळ्या भावंडांनी अंजन घातले आहे. एका रिसोर्टच्या स्वीमिंग टँकमध्ये बुडत असलेल्या मुलीचा जीव वाचवून आपल्या साहसीवृत्तीची छाप सोडली आहे. लक्ष्मीनगरात राहणारे गिरीश कठाळे यांची मुले ओम आणि सोहम आईसोबत एका रिसॉर्टमध्ये सहलीला गेले होते. येथील स्वीमिंग टॅँकमध्ये एका मुलीने उडी घेतली. तिला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडायला लागली, आरडाओरड सुरू झाली. आजूबाजूचे सर्व टँकच्या सभोवताल गोळा झाले. मात्र तिला वाचविण्याचे साहस कुणीच दाखविले नाही. ओमच्या हे लक्षात आले. त्याने लगेच पाण्यात उडी घेतली. लागलीच सोहमही पोहत पोहत तिच्याजवळ पोहोचला. दोघांनीही तिचे हात पकडून तिला बाहेर काढले. ती घाबरलेली होती, तिच्यावर प्रथमोपचार केल्यावर ती बरी झाली. उपस्थित सर्वांनी ओम-सोहमच्या धैर्याचे कौतुक केले. तिच्या पालकांचे तर आनंदाश्रू थांबत नव्हते. देवदूत म्हणून येऊन या दोघांनी माझ्या मुलीला पुनर्जन्मच दिला, अशा भावना त्यांनी ओम-सोहमच्या पालकांकडे व्यक्त केल्या. ओम आणि सोहम हे दोघेही बी.आर. मुंडले शाळेत ५ व्या वर्गात शिकत आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते पोहण्याचा सराव करीत आहेत. दोघेही उत्तम पोहतात. त्यांच्या पराक्रमाची वार्ता शाळेत, परिसरात, शहरातही पसरल्याने सर्वांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(प्रतिनिधी)आयुष्यभर खंत असतीतुम्ही एवढे साहस कसे काय दाखविले असे दोघांनाही विचारले असता ते म्हणाले, आम्हाला पोहता येते. आम्ही तिला वाचवू शकलो नसतो, तर आमच्या पोहण्याला काहीच अर्थ नसता. आयुष्यभर मनात खंतही असती. तिला वाचवायचे आहे, एवढेच मनात होते. त्यात आम्ही यशस्वी झालो, अशा भावना दोघांनीही व्यक्त केल्या. महापौरांकडून कौतुकाची थापमहापौरांना जेव्हा या दोन्ही बालकांच्या पराक्रमाची वार्ता कळली, तेव्हा महापौर प्रवीण दटके यांनी घरी जाऊन दोघांचाही सत्कार केला. त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे, सहा. आयुक्त राठोड, झोनचे सर्व अधिकारी उपस्थित होते.