नागपूर : विक्तुबाबानगर येथील रहिवाशांच्या विविध मागण्यांसाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचा मोर्चा यशवंत स्टेडियममधून निघाला. मोर्चा मुंजे चौक, आनंद टॉकीज, मानस चौक, गणेश टेकडी उड्डाणपुलाखालून स्टेशन रोडने जयस्तंभ चौकात आला. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स येथे पोलिसांनी हा मोर्चा अडवून धरला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे हे निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले.नेतृत्व संजय बोंडे, नटराजन पिल्लई, अनिल पाचोळेमागण्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक घरातील वयोवृद्ध नागरिकांना १० लाख रुपये मदत करावीप्रत्येक कुटुंबाला १५०० चौरस फुटाची जागा द्यावीघरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावीघरातील सर्व सदस्यांना बीपीएलची मान्यता आणि आरोग्य सुविधा द्यावीप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकास ३० लाख रुपये कर्ज द्यावे
मिहान प्रकल्पग्रस्तांना १० लाखाची मदत द्या
By admin | Published: December 18, 2014 2:49 AM