लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो, किंवा निवृत्त असो, त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, या मागणीला घेऊन पोलीस कुटुंबाचा मोर्चाने शुक्रवारी विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा लक्ष वेधून घेणारा ठरला.पोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला आघाडीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. पोलीस विभाग हा अनुशासन व शिस्तीचा विभाग असल्यामुळे समाजाची रक्षा व सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांना स्वत:वर होणाºया अन्यायाकरिता लढता येत नाही, परंतु पोलीस कुटुंब त्यांच्या मागण्यांकरिता लढु शकते, हे या मोर्चातून दाखवून दिले, असे मत जानरावजी लोणकर यांनी येथे व्यक्त केले.नेतृत्व जानराव लोणकर, किशोर ढोणे, सुरेश बोरकर, आशिष कावळे, वर्षा मारबते, प्रतिभा ढोणे, सविता उईकेमागण्या
- पोलीस पाल्यांना पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण.
- शिक्षणाच्या योग्यतेनुसार अनुकंपाच्या जागा भरा
- महाराष्ट्र कुटुंब कल्याण योजना बंद करून नवीन योजना सुरू करा.
- पोलिसांना वेतन राष्ट्रीया बँकमधूनच अदा करा.
- सेवानिवृत्तीनंतर आजन्म पेन्शन द्या.