लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली.गजभिये म्हणाले, दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास करण्यासाठी ३२५ कोटी रुपयांची विकास योजना तयार करण्यात आली. त्यातील ४० कोटी रुपयाचा हा धनादेश होता. संबंधित धनादेश नागपूर सुधार प्रन्यासला प्रदान करण्यात आला होता. परंतु या निधीला प्रशासकीय मंजुरीच प्रदान करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेला हा निधी अनेक महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरीसाठी अडकून पडला आहे.दीक्षाभूमीशी संबंधित प्रत्येक काम रेंगाळत असल्याने आंबेडकरी जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन व खोटे धनादेश देण्याचा प्रकार युती सरकारने चालविला आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.
दीक्षाभूमीसाठी जाहीर केलेले ४० कोटी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:53 PM
मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली.
ठळक मुद्देप्रकाश गजभिये यांची विधान परिषदेत मागणी